अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- शहरातील विविध विषयांवर महानगरपालिकेला निवेदन देऊन उत्तर मिळत नाही. शहरातील खड्डे व बंद असलेले पथदिवे चालू करण्याच्या मागणीसाठी समाजवादी पार्टी २७ डिसेंबर राेजी महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढणार अाहे, अशी माहिती समाजवादी पार्टीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी दिली.(Municipal Corporation)
महापालिकेला समाजवादी पार्टीने विविध विषयांवर निवेदने दिली. परंतु महापालिकेने आतापर्यंत एकाही पत्राचे उत्तर दिलेले नाही.
तसेच रस्त्याचे रखडलेल्या कामामुळे संपूर्ण शहरांमध्ये रस्ता खराब झाला अाहे. रस्त्याचे काम चालू करावे. शहर संध्याकाळच्या वेळेत अंधारात असते.
महानगरपालिका मात्र प्रकाशात आहे. त्यामुळे रस्त्याचे काम व लाईटचे काम त्वरित चालू करण्यासाठी समाजवादी पार्टीने दि. २७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. महानगरपालिकेला जाग येण्यासाठी धडक मोर्चा काढण्यात येणार अाहे.