अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- महिन्यापासून बंद असलेल्या जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा बुधवारपासून शासनाच्या आदेशाचे पालन करत सुरू झाल्या आहेत.
पहिल्या दिवशी 33 टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. दरम्यान जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता.
जिल्ह्यातील 95 टक्के शाळा सुरू झाल्या असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या 3569 प्राथमिक शाळा असून सर्व शाळा सुरू झाल्या आहेत.
पहिल्यादिवशी दोन लाख 19 हजार विद्यार्थ्यांपैकी 76 हजार विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. 566 पैकी 551 खासगी प्राथमिक शाळा सुरू झाल्या असून एक लाख 13 हजार विद्यार्थ्यांपैकी 38 हजार विद्यार्थी शाळेत आले होते.
माध्यमिकच्या 1230 पैकी 1199 शाळा सुरू झाल्या असून साडेपाच लाख विद्यार्थ्यांपैकी एक लाख 90 हजार विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली होती.