अहमदनगर शहर

नगरचे ते कुत्रे इतके भयानक! की कुत्र्याविरोधात वकिलाने थेट न्यायालयाचे दार ठोठावले

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- अहमदनगरमधील एका गल्लीत भटके कुत्रे नेहमीच त्रास देत असायचे. ते असाह्य झाल्याने मनपा कडे वारवांर तक्रार देऊनही काहीच उपयोग झाला नाही.

म्हणून वकिलाने चक्क सोसायटीतील भटक्या कुत्र्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या याचिकेमुळे शहरातील मोकाट कुत्रे त्या गल्लीत नेमकं काय काय करत होती.

अशा नानाविध चर्चेला चांगलीच रंगत चढली आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हेरीटेज आणि लीना पार्क सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आपल्या मुलभूत हक्कांवरच गदा येत असल्याचे म्हणत सोसायटीतच राहणाऱ्या अ‍ॅड. सत्यजित कराळे पाटील या वकिलाने थेट औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

अहमदनगर महापालिकेच्या प्रभारी सॅनेटरी अधिकाऱ्यांशी याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, महापालिकेचे पिंपळगाव माळवी येथे शेल्टर होम असून कायदेशीर पद्धतीने कुत्र्यांची नसबंदी करून त्यांना सोडून दिलं जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मोकाट कुत्रे काय काय करायचे चारचाकी वाहनांवर चढून नुकसान करणे, दुचाकीचे सीट फाडणे, पार्किंगमध्ये खेळण्यासाठी जाणाऱ्या लहान मुलांवर हल्ला करणे, सोसायटीत येणाऱ्या नागरिकांवर धावून जाणे, बाहेरील कचऱ्यातून खाद्यपदार्थ सोसायटीत आणणे, उगीचच मोठं मोठ्याने कुई-कुई करणे, कारण नसताना भुंकत राहणे असे उपद्रव या भटक्या कुत्र्यांकडून सुरू आहेत.

याबाबत वारंवार अहमदनगर महापालिकेला लेखी तोंडी तक्रारी केल्या. मात्र याकडे महानगरपालिकेचे प्रशासन लक्ष देत नसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे.

काहींचं म्हणणं आहे कि महापालिका जाणीवपूर्वक या तक्रारीकडे दुर्लक्ष्य करते. या अगोदरही उत्तराखंडमध्ये नदीला सजीवांचा (माणसांचा) दर्जा देण्याच्या मागणीसंदर्भात याचिका दाखल केली होती.

यावेळे नदीला सुद्धा काही अधिकार आहेत असे न्यायालयाने नमूद करत नदीचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात सरकारला सुनावले होते.

औरंगाबाद खंडपीठात सत्यजित कराळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय याबाबत नेमका काय निर्णय देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office