अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- मनपाच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात क्षयरुग्ण शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत ही मोहीम चालणार असून नगर शहरातील 40 हजार नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट मनपाने ठेवले आहे.
ही तपासणी महापालिकेच्या शहर क्षयरोग केंद्र, नवी पेठ दवाखाना, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज, निदान डायग्नोस्टिक सोनोग्राफी अॅँड एक्सरे क्लिनिक,
सिव्हील हॉस्पिटल येथे मोफत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. राजूरकर यांनी केले आहे. दरम्यान मनपाच्या या मोहिमेत झोपडपट्टी, वृद्धाश्रम,
बांधकाम स्थळावरील कामगार, अनाथालय, रेस्टॉरंटमधील कर्मचारी, कारागृहातील कैदी, निर्वासितांची छावणी, रात्रीची आश्रयस्थाने, एचआयव्ही अतिजोखीम गट,
बेघर, रस्त्यावरची मुले, निराधार घरे आदी ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे. 30 आशा वर्कर, 26 स्वयंसेवकामार्फत प्रत्यक्ष गृहभेटी देऊन ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
यामध्ये 40 हजार नागरिकांच्या तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.