अहमदनगर शहर

बाथरूममध्ये अंघोळ करणार्‍या महिलेसोबत तरूणाने केले असे कृत्य…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  बाथरूममध्ये अंघोळ करणार्‍या महिलेचे एकाने मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.(ahmednagar crime)

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंग, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतीन हुसेन शेख (रा. आंबेडकर चौक, झेंडीगेट) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत राहणार्‍या महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आमच्या घराच्या बाजूला बाथरूममध्ये अंघोळ करत असताना मतीन शेख याने त्याच्या मोबाईलमध्ये बाथरूमच्या दरवाजाच्या मोकळ्या जागेतून चित्रीकरण करून गैरवर्तन केले.

चित्रीकरण केले जात असल्याचे लक्षात येताच मोबाईल पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मतीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, मोबाईल फोडला असल्याचे पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अजित पाटील करीत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office