अहमदनगर बातम्या

Ahmednagar Corona Update : 743 बाधितांची रुग्ण संख्येत भर,जाणून घ्या सविस्तर अपडेट्स…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ८२६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६१ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७४३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ८०१ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २२१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८६ आणि अँटीजेन चाचणीत २३६ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०१, अकोले ०१, जामखेड ०७, कर्जत ०१, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण २२, नेवासा ०१, पारनेर ४१, पाथर्डी ३५, राहुरी ०२, संगमनेर ९२, शेवगाव ०१ आणि श्रीगोंदा १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०८, अकोले ३४, कर्जत ०३, कोपरगाव २३, नगर ग्रा.१७, नेवासा १८, पारनेर ११, पाथर्डी ०१, राहाता ४७, राहुरी २१, संगमनेर ३४, शेवगाव २९, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ३० आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २३६ जण बाधित आढळुन आले. मनपा ०६, अकोले २१, जामखेड ०९, कर्जत ३३, कोपरगाव ०४, नगर ग्रा. १७, नेवासा ०९, पारनेर ३४, पाथर्डी २०, राहाता १६, राहुरी १०, संगमनेर ३१, शेवगाव ०८, श्रीगोंदा ०८, श्रीरामपुर ०६ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २५, अकोले ५६, जामखेड ०९, कर्जत २९, कोपरगाव १६, नगर ग्रा. ४७, नेवासा ४४, पारनेर ८९, पाथर्डी ६२, राहाता ९३, राहुरी ३८, संगमनेर २१०, शेवगाव ४९, श्रीगोंदा २९, श्रीरामपूर १९, कॅंटोन्मेंट बोर्ड ०३, इतर जिल्हा ०६ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:३,३०,०४१

उपचार सुरू असलेले रूग्ण:४८०१

पोर्टलवरील मृत्यू नोंद:६७७८

एकूण रूग्ण संख्या:३,४१,६२०

Ahmednagarlive24 Office