Ahmednagar Corona Update : जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर आकडेवारी इथे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज ७२० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३५ हजार ४८९ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५०५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार २८६ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १११, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २४५ आणि अँटीजेन चाचणीत १४९ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १९, अकोले ०२, जामखेड ०८, नगर ग्रामीण ०८, पारनेर १८, शेवगाव ०१, श्रीगोंदा ५१, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४, अकोले १०, कर्जत १२, कोपरगाव ०५, नगर ग्रा.०९, नेवासा १२, पारनेर १८, पाथर्डी १४, राहाता २९, राहुरी १२, संगमनेर ४९, शेवगाव २३, श्रीगोंदा ०९, श्रीरामपूर १९ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १४९ जण बाधित आढळुन आले. मनपा ०३, अकोले ०९, कर्जत ११, कोपरगाव १८, नगर ग्रा. ०१, नेवासा १०, पारनेर १४, पाथर्डी ०८, राहाता १५, राहुरी १२, संगमनेर ०८, शेवगाव २५, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ०८ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३०, अकोले २२, जामखेड १२, कर्जत ४८, कोपरगाव २९, नगर ग्रा. ५६, नेवासा ०९, पारनेर ६०, पाथर्डी ५९, राहाता ३७, राहुरी ३२, संगमनेर १८७, शेवगाव ३५, श्रीगोंदा ६२, श्रीरामपूर २८, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा १३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:३,३५,४८९

उपचार सुरू असलेले रूग्ण:४२८६

पोर्टलवरील मृत्यू नोंद:६८६२

एकूण रूग्ण संख्या:३,४६,६३७