अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात आज 31 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 51 हजार 934 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.65 टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 244 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1306 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 43 खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 167 आणि अँटीजेन चाचणीत 34 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 14, कर्जत 01, नगर ग्रा. 09, नेवासा 02, पारनेर 03, पाथर्डी 02, राहुरी 01, संगमनेर 02, श्रीगोंदा 04, श्रीरामपूर 01, कॅन्टोनमेंट बोर्ड 01 आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 65, अकोले 10, जामखेड 01, कर्जत 02, कोपरगाव 15,
नगर ग्रा. 11, नेवासा 05, पारनेर 07, पाथडी 02, राहाता 05, राहुरी 02, संगमनेर 10, शेवगाव 01, श्रीगोंदा 03, श्रीरामपूर 11, कॅन्टो्नमेंट बोर्ड 03, इतर जिल्हा 12 आणि इतर राज्ये 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 34 जण बाधित आढळुन आले. यात मनपा 05, अकोले 02, कोपरगाव 04, नगर ग्रा.04, पाथर्डी 07, राहाता 05, राहुरी 03, संगमनेर 01 आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 02, अकोले 01, जामखेड 01, कोपरगाव 02, नगर ग्रा 02, नेवासा 01, पारनेर 02, पाथर्डी 02, राहाता 02, राहुरी 02, संगमनेर 02, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 03, कॅन्टोन्मेंट बोर्ड 02, इतर जिल्हा 04 आणि इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:3,51,934
उपचार सुरू असलेले रूग्ण:1306
पोर्टलवरील मृत्यू नोंद:7157
एकूण रूग्ण संख्या:3,60,397
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा