याबाबत पोलिसांनी सांगितले, की विलास भागाजी शेंडगे (वय ५५ वर्षे) हे राहुरी तालुक्यातील गंगापूर शिवारात राहातात. त्यांच्या शेतीलगत सूर्यभान ममताजी भुजबळ यांची शेतजमीन आहे. ते या ठिकाणी राहायला आहेत.
शेंडगे व भुजबळ यांच्यात सामाईक बांध आहे. त्यावरुन दोघांत नेहमी वाद सुरु असतात. दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास विलास शेंडगे हे त्यांच्या शेत गट नं. ५८ मधील शेतीचे बांध वाकडे झाल्याने गावातील लोकांच्या मदतीने बांध सरळ करुन घेणार होते; परंतु या ठिकाणी गावातील लोक यायच्या आगोदर तेथे आरोपी आले व शिवीगाळ करु लागले.
त्यावेळी विलास शेंडगे त्यांना म्हणाले लोक यायच्या आगोदर तेथे आरोपी आले व शिवीगाळ करु लागले. त्यावेळी विलास शेंडगे त्यांना म्हणाले की, मी गावातील प्रतीष्ठित लोकांना बोलावुन घेतले आहे. ते आले की, त्यांच्या मदतीने बांध सरळ करुन घेऊ, असे म्हणाल्याचा त्यांना राग आल्याने आरोपींनी विलास शेंडगे यांना लाथा बुक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले. पुन्हा येथे बांध सरळ करायला कोणाला बोलावले, तर तुला जीवे ठार मारून टाकू, अशी धमकी दिली…
विलास भागाजी शेंडगे यांनी घटनेनंतर राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी सुर्यभान ममताजी भुजबळ, बाळासाहेब ममताजी भुजबळ, इंद्रायणी सुर्भान भुजबळ, मंगल बाळासाहेब भुजबळ या चार जणांवर गुन्हा रजि. नं. १३१३/२०२३ नुसार भादंवि कलम ३२३, ३२४, ३४, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.