अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- घरासमोर कचरा जाळला म्हणून टोळक्याने पाच जणांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. भिंगारमधील सैनिकनगर परिसरात ही घटना घडली.
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गणेश सुनील कांबळे, महेश सुनील कांबळे, अक्षय सुनील कांबळे, सुनिल नामदेव कांबळे राहणार डेरी फार्म सैनिक नगर भिंगार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मारहाणीत आशिष रंगनाथ थोरात, महेश पांडुरंग भोसले, पंकज भोसले, हर्षद जोगदंड हे जखमी झाले आहेत.
याबाबत माहिती अशी की, माधुरी थोरात यांच्या वडिलांच्या घरासमोर गणेश कांबळे व इतरांनी कचरा जाळला होता. थोरात यांनी कचरा का जाळला, अशी विचारणा केली.
त्यामुळे रागाविलेल्या टोळक्याने थोरात यांचे पती भाऊ व इतरांना काठी, दगड, विटाने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माधुरी थोरात यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®