Ahmednagar Crime : तरुणाची हत्या की आत्महत्या ? नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव शिवारात एका तरुणाचा मृतदेह गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आला आहे. समाधान अंकुश मोरे (वय २०, रा. एरंडोली, ता.श्रीगोंदा) असे मयताचे नाव असून, त्याच्या काही नातेवाईकांनी घातपात झाल्याचा आरोप करीत शवविच्छेदन होऊ न देण्याची भूमिका घेतली.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, मयत समाधान मोरे हा मढेवडगाव येथील एका ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत होता. त्यामुळे तो कामाच्या निमित्ताने सतत मढेवडगाव परिसरात असायचा.

शनिवारी (दि. १५) सकाळी मढेवडगाव शिवारात त्याचा मृतदेह झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आला. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणला असता, ही आत्महत्या नसून घातपात झाला असल्याचा आरोप करीत तसा गुन्हा दाखल झाल्याशिवाय शवविच्छेदन होऊ न देण्याची भूमिका काही नातेवाईकांनी घेतली.

त्यांनी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांची भेट गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी नातेवाईकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी होती. परंतु, प्रथमतः आकस्मिक मृत्यूची नोंद होईल. शवविच्छेदनाच्या उत्तरीय तपासणी अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी सांगितले