शिक्षणाच्या आधुनिक वाटा हाताळल्याने जिल्हा मराठा राज्यात अग्रगण्य -नंदकुमार झावरे पाटील

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :  शाहू महाराजांनी नगर येथे येऊन बहुजन समाजाच्या ग्रामीण भागातील मुलांसाठी 1914 साली सुरू केलेल्या चौथे छत्रपती शाहू बोर्डींग ते उच्च व तांत्रिक शिक्षण देणारी महाविद्यालये हा महाराष्ट्राला पथदर्शी असणारा प्रवास सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या पदाधिकारी व ज्ञानाच्या दृष्टीने प्राचार्य, शिक्षक यांच्या अथक व नियोजनबद्ध प्रयत्नांनी शक्य झाला आहे.

शालेय शिक्षणाबरोबर संस्थेने मास कम्यूनिकेशन, इंन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, इंन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ड्रामा, म्युझिक, प्रिंटींग या सारख्या आधुनिक व व्यवसायाभिमूख शिक्षणाच्या वाटा हाताळल्याने अहमदनगर जिल्हा मराठा संस्था राज्यात शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य ठरली असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष मा.आ. नंदकुमार झावरे पाटील यांनी व्यक्त केले. तर संस्थेचा गौरवशाली इतिहास सांगितला.

महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ आयोजित व आत्मा मलिक शैक्षणिक संकुल यांच्या सहयोगाने आयोजित राज्यस्तरीय शिक्षणाच्या आधुनिक वाटा या वेबीनारमध्ये झावरे बोलत होते. पुढे वेबीनारमध्ये बोलताना संस्थेचे सचिव जी.डी.खानदेशे यांनी संस्थेनी स्कॉलरशीप, ज्ञानवर्धिनी, एन.एन.एम.एम.एस, नवोदय, एनटीएस तसेच विविध स्पर्धा परीक्षेत केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीची माहिती देताना पुढील काळात महाराष्ट्रात सर्वोत्तम कामगिरीचे ध्येय गाठण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगितले.

तसेच संस्थेच्या जून्या पत्र्यांच्या इमारतींच्या जागी सर्वसुविधांनी युक्त स्लॅबच्या इमारती संस्था चालकांनी उभारताना मी इंजिनिअर असल्याचा फायदा झाला. संस्थेने शाळांना डिजीटल क्लासरूम, सॉफ्टवेअर, सोलर कनेक्टीव्हिटी सिस्टीम, संगणक लॅब, विज्ञान, क्रीडा व भूगोल विषयक अत्याधुनिक साहित्य पुरविल्याचे या वेळी सांगितले.

संस्थेचे सहसचिव अ‍ॅड. विश्‍वासराव आठरे यांनी ऑनलाईन एज्युकेशन काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. तसेच पालकांनी शिक्षणावर खर्च होणारी रक्कम इन्व्हेस्टमेंट म्हणून समजावी व लग्न कार्यात आज भांड्यापेक्षाही संगणक, लॅपटॉप, टॅब, स्कॅनर, प्रिंटर, स्मार्ट टीव्ही मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी देण्याची गरज असल्याचे व गुणदोषाकडे न पाहता शेती औजाराप्रमाणे ऑनलाईनचे साहित्य विद्यार्थ्यांना घेऊन द्यावीत असे आवाहन केले.

तसेच शासनानेही या बाबत लक्ष घालण्याचे मत व्यक्त केले. या वेळी संस्थेचे खजिनदार डॉ. विवेक भापकर यांनी शाळा सुरू झाल्यानंतर शालेय स्तरावर पालक, शिक्षक व विद्यार्थी यांनी कशी काळजी घेतली पाहिजे याची प्रात्यक्षिकातून माहिती देत शासनाच्या सूचना पाळण्याचे आवाहन केले.

न्यू आर्टसचे प्राचार्य झावरे यांनी शिक्षणाच्या आधुनिक वाटा हाताळल्याने कॉलेज नॅक मानांकनात देशात चौथे व राज्यात पहिले कॉलेज ठरले असल्याची माहिती दिली. संस्था निरीक्षक रंगनाथ भापकर यांनी विषय मांडणी करत संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या कार्याचा परीचय महाराष्ट्राला करून दिला. अरूण गांगर्डे व प्रकाश मिंड यांनी ऑनलाईन एज्युकेशन अ‍ॅपचा डेमो दाखविला.

राज्य भरातून शिवदत्त ढवळे, दत्तात्रय मारकड, गोवर्धन राठोड, घनःशाम सानप, भारत इंगवले, प्रलोभ कुलकर्णी यांनी प्रश्‍न विचाराले. या सर्व प्रश्‍नांची उत्तरे पदाधिकारी यांनी दिली. या राज्यस्तरीय वेबीनारचे सूत्रसंचालन धुळे येथील आनंद पवार यांनी केले. क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी प्रास्ताविक केले.

आभार सातारा येथील ज्ञानेश काळे यांनी मानले. वेबीनारच्या आयोजनासाठी दत्तात्रय नारळे, आप्पासाहेब शिंदे, विजय जाधव यांनी तर गणेश म्हस्के, प्रशांत खिलारी व बाळासाहेब कोतकर यांनी तांत्रिक सहकार्य पुरविले.

महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाने आत्मा मलिक शैक्षणिक संकुल यांचे सहयोगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमास हजारो शिक्षक व शिक्षणप्रेमी उपस्थित होते. उद्या होणार्‍या वेबीनारमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, हस्ती शैक्षणिक संकुल, दोंडाईचा धुळे व आत्मा मलिक शैक्षणिक संकुल या संस्था पदाधिकार्‍यांचे शिक्षणाच्या आधुनिक वाटा या वेबीनारमध्ये मार्गदर्शन होणार असून सहभागी होण्याचे आवाहन संघटना सहसचिव राजेश जाधव यांनी केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24