अहमदनगर जिल्ह्यात आता राहिले फक्त ‘इतके’ कोरोना बाधित रुग्ण !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात रविवारी १०० रुग्णांना रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार १५३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८१ टक्के झाले आहे.

दरम्यान, २४ तासांत रुग्णसंख्येत १७८ ने वाढ झाली. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १५०३ आहे. तिघांचा मृत्यू झाला.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३५, खासगी प्रयोगशाळेत ६६ आणि अँटीजेन चाचणीत ७७ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा १०, जामखेड २, कोपरगाव २, नगर ग्रामीण ७, नेवासे १, पाथर्डी ३, राहुरी १, संगमनेर १, शेवगाव १, कॅन्टोन्मेंट १, मिलिटरी हॉस्पिटल १ आणि इतर जिल्हा १ रुग्णाचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत मनपा १५, अकोले १, जामखेड १, कोपरगाव ३, नगर ग्रामीण ५, पारनेर १, पाथर्डी ३, राहाता ९, राहुरी २, संगमनेर ११, शेवगाव ६, श्रीगोंदे ३, श्रीरामपूर ५, कॅन्टोन्मेंट १ रुग्णाचा समावेश आहे.

अँटीजेन मनपा १२, अकोले ५, जामखेड ५, कर्जत ३, कोपरगाव १, नगर ग्रामीण ११, नेवासे ५, पारनेर २, पाथर्डी १७, संगमनेर ६, शेवगाव ८, श्रीगोंदे २ रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24