अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- चार वर्षाच्या मुलीवर 32 वर्षाच्या नराधमाचा बलात्कार केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली असून श्रीरामपूर तालुका पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध आहे.(ahmedmagar rape News)
श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या राहता तालुक्यातील जळगाव या गावांमध्ये राहणाऱ्या सिकंदर हुसेन शेख उर्फ काल्या(वय -३२ ) याने परिसरातील एका तूर पिकाच्या शेतामध्ये चार वर्षाच्या लहान मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी मुलीच्या आज्जीच्या तक्रारीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 402/ 2021 प्रमाणे बलात्कारासह ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास डीवायएसपी श्री.राहुल मदने,अतिरिक्त चार्ज श्रीरामपूर व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री.मधुकर साळवे यांच्याकडुन कसुन शोध सुरू आहे.