अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्याची जलदायिनी असलेलया मुळातील पाणीसाठ्याचा लोखंडी दरवाज्याला स्पर्श !

Published by
Ahmednagarlive24 Office

येथील मुळा धरणातील पाणीसाठा १४ हजार ६२६ दशलक्ष घनफूट झाला असून धरणातील पाण्याने लोखंडी दरवाज्याला स्पर्श केला आहे. त्यामुळे मुळा लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे. तर धरणात कोतुळ येथून ६२६० क्यूसेसने आवक सुरु असल्याची माहिती शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

अहिल्यानगर जिल्ह्याची जलदायिनी असलेले २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणात का ल शनिवारी (दि.२७) सायंकाळी सहा वाजता ५६ टक्के पाणीसाठा झाला होता. धरणात १४ हजार ६२६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.

सायंकाळी सहा वाजता कोतूळ येथील आवक ६ हजार २६० क्युसेक आहे. २१ जुलैपासून धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत सप्ताहात पुढील प्रमाणे पाणी पातळी वाढली. दि. २१ जुलै ९२१८ दशलक्ष घनफूट, २२ जुलै ९४२० दशलक्ष घनफूट, २३ जुलै ९९५६ दशलक्ष घनफूट, २४ जुलै १०६३६ दशलक्ष घनफूट, २५ जुलै ११९१५ दशलक्ष घनफूट, सायंकाळी १२९८० दशलक्ष घनफूट, २६ जुलै १३७१५ दशलक्ष घनफूट, अशा पाणीसाठ्याची नोंद झाली.

पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत सप्ताहात पुढील प्रमाणे पाणी पातळी वाढली. दि. २१ जुलै ९२१८ दशलक्ष घनफूट, २२ जुलै ९४२० दशलक्ष घनफूट, २३ जुलै ९९५६ दशलक्ष घनफूट, २४ जुलै १०६३६ दशलक्ष घनफूट, २५ जुलै ११९१५ दशलक्ष घनफूट, सायंकाळी १२९८० दशलक्ष घनफूट, २६ जुलै

या सहा दिवसात धरणात ४५२७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा वाढला. काल सायंकाळी सहा वाजता धरण निम्मे भरले. आज धरणातील पाण्याने लोखंडी दरवाज्याना स्पर्श केला आहे.

त्यामुळे मुळा धरणाचे परिस्थितीवर मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता विलास पाटील, शाखा अभियंता राजेंद्र पारखे, सलीम शेख व कर्मचारी लक्ष देऊन आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office