Ahmednagar News : दरवर्षीप्रमाणे देण्यात येणारे जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. तालुकानिहाय १४ व २ केंद्रप्रमुख अशा एकूण १६ जणांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या प्रक्रियेसाठी १०० गुणांची प्रश्नावली प्रसिद्ध करण्यात आली. प्रत्येक तालुक्यातून आलेल्या प्रस्तावाची गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांच्यामार्फत पडताळणी होवून ३ शिक्षक व १ केंद्रप्रमुखाचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयास पाठविण्यात आले.
जिल्हा स्तरावरुन प्रस्तावप्राप्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांची २५ गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. एकूण १२५ गुणांपैकी ज्यांना सर्वात जास्त गुण मिळाले, अशा शिक्षकांना आदर्श पुरस्कारासाठी निवडण्यात आली, अशी माहिती जि.प.च्या शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली.
पुरस्कार्थी व त्यांच्या शाळांची नावे अशी नरेंद्र खंडू राठोड (जि.प. प्राथ. शाव्य, तीर्थाची वाडी, अकोले), सोमनाथ बबनराव घुले (निमगाव माथा, संगमनेर), सचिन भिमराव अडांगळे (बहादरपूर, कोपरगाव), भारती दिगंबर देशमुख (खर्डे पाटोळे, राहाता), सविता विठ्ठल साळुंके (गोंडेगाव, श्रीरामपूर),
अनिल नामदेव कल्हापुरे (पिंप्री अवघड, राहुरी), सुनिता भाऊसाहेब निकम ( भालगाव, नेवासा), अंजली तुकाराम चव्हाण (बोधेगाव, शेवगाव), भागिनाथ नामदेव बडे (सोमठाणे नलवडे, पाथर्डी), एकनाथ पंढरीनाथ चव्हाण (बसरवाडी, जामखेड),
किरण रामराव मुळे (बर्गेवाडी, कर्जत), जावेद आदमभाई सय्यद (मढेवडगाव, श्रीगोंदा), विजय भिमराव गुंजाळ (सांगवीसूर्या, पारनेर), साधना जयवंत क्षिरसागर (कौडगाव, अ.नगर), रावजी तबा केसकर (पारनेर केंद्र) व अशोक कारभारी विटनर ( उक्कलगाव, श्रीरामपूर).