राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यावर विशेष लक्ष दिले असून, खा. विखे यांच्या शिफारशीनुसार तालुक्यातील २२ रस्त्यांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती युवानेते राहुल शिंदे पाटील यांनी दिली.
खा. विखे यांच्या माध्यमातून तालुक्यातील रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, सभामंडप व शाळाखोल्या, पंतप्रधान ग्रामसडक योजना, वयोश्री योजना, यासाठी मोठया प्रमाणात निधी मिळाला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
या वेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष सुनिल थोरात, युवा नेते सचिन वराळ पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहकले, डॉ. भाऊसाहेब खिलारी उपस्थित होते.
मंजूर रस्त्यांमध्ये रांजणगाव मशिद ते शिंदेवाडी रस्ता, अस्तगाव तरोडी वस्ती सी.डी. वर्क करणे, भोयरे गांगर्डा ते सारोळा सोमवंशी रस्ता, शहांजापुर रस्ता, जातेगाव फाटा ते पळवे रस्ता, घाणेगाव ते मट वस्ती,
यादववाडी ते भोयरे गांगर्डा रस्ता, रुईछत्रपती सी. डी. वर्क रस्ता, लोणीमावळा ते हनुमानवाडी बाभुळवाडे रस्ता, शिरापुर ते पाबळ रस्ता डांबरीकरण करणे, निघोज ते कुंड ते सुलाखेवाडी गाडीलगाव रस्ता डांबरीकरण करणे,
निघोज ते बोदगेवाडी- गुणोरे रस्ता डांबरीकरण करणे, म्हसे खुर्द – जाधवस्ती – गुणोरे रस्ता डांबरीकरण करणे, गारखिंडी ते नांदूरपठार रस्ता डांबरीकरण करणे, पाबळ कवडेमळा ते लोणीमावळा रस्ता, गुणोरे ते खोसे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे,
वडनेर बुद्रुक ते दत्तमंदिर बोऱ्हाडेमळा रस्ता डांबरीकरण करणे, भाळवणी माळवाडी ते वडगाव आमली रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे, नागवेंदवाडी रस्ता ते खारवाडी रस्ता डांबरीकरण करणे, दैठणे गुंजाळ ते वडगाव आमली रस्ता डांबरीकरण करणे, पळशी ते माळवाडी रस्ता, या रस्त्यांचा समावेश आहे…