अहमदनगर बातम्या

Ahmednagar Gram Panchayat Election 2022 : ह्या दिवशी होणार ग्रामपंचायतीच्या निवडणूका !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Ahmednagar News : निधन, राजीनामा, अपात्रता व इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी पोट निवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

५ जून २०२२ रोजी मतदार घेण्यात येणार आहे. ६ जून २०२२ रोजी निकाल घोषित करण्यात येणार आहे. अशी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत शाखेने दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी जाहीर केलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणूकांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देणारे परिपत्रक अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (ग्रामपंचायत) शाखेने जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांना पाठविले आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार तारीख निहाय निवडणूक कार्यक्रम घेण्यात यावा. अशा सूचना या परिपत्रकांत देण्यात आल्या आहेत.

या निवडणूकांसाठी १३ मे २०२२ ते २० मे २०२२ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. २५ मे २०२२ रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेता येईल.

५ जून २०२२ रोजी मतदान होणार आहे. ६ जून २०२२ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्या २९ एप्रिल २०२२ मधील परिपत्रकातील सूचनांचे तंतोतत पालन करून सदर पोटनिवडणूकांचा कार्यक्रम राबवावा. अशा सूचना ही ग्रामपंचायत शाखेने दिल्या आहेत

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office