अहमदनगर Live24 टीम, 07 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटल मधल्या आय सी यु मध्ये वीज जोडण्या सदिश असल्याचे पत्र देण्यात आले होते. या पत्राची दखल घेऊन सदोष वीज जोडण्या तात्काळ दुरुस्त केल्यास ही गंभीर घटना घडली नसती.
सर्वच शासकीय कार्यालयाचे बांधकाम आणि वायरिंग यावर लक्ष ठेवणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने हे पत्र दिले होते. ही घटना घडल्यानंतर शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख गिरीश जाधव , संजय वल्लाकट्टी आणि मंदार मुळे यांनी लगेच
नगरच्या पी डब्ल्यू डी चे वीज तांत्रिक अभियंता जगदीश काळे यांच्याशी संपर्क साधला आणि या घटनेस आपणच जबाबदार असल्याचा जाब त्यांना त्यांनी विचारला तेव्हा जगदीश काळे यांनी जाधव यांना हे पत्रच दाखवले. काळे यांनी नगरचे सिव्हिल सर्जन डॉ . सुनील पोखरणा यांना पत्र दिले होते.
त्यात यांनी नमूद केले होते की , सिव्हिल हॉस्पिटल मधील आय सी यु मधील वायरिंग ही सदोष आहे. तिथे ए सी हा २४ तास सुरु असतात आणि ए सी च्या व्हेन्ट पाईप सोबतच ऑक्सिजनचा देखील पाईप गेलेला आहे. आणि या पाइपवर कमी तापमानात बर्फ तयार होऊन साचतो.
आणि हा बर्फ वितळल्यानंतर त्यांचे पाणी वायरींग वर पडत असल्याने सतत शॉर्ट सर्किट होऊन विद्युत पुरवठा खंडित होतो. असे नेहमी होत असल्याने ही तांत्रिक चूक दुरुस्त करण्यात यावी अन्यथा मोठी आग लागण्याची शक्यता आहे. असे पात्रात नमूद करण्यात आले होते.
काळे यांनी हे पत्र दिनांक ६ सप्टेंबर २०२१ रोजी दिले होते. मात्र आपल्या हेकेखोर भ्रष्ट कारभारात मग्न असलेल्या डॉ . पोखरना यांनी या पत्रकाला सपशेल केराची टोपली दाखवली.आणि बरोबर दोन महिन्यांनी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेस सर्वस्वी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरना हेच जबाबदार आहेत .
या पूर्वीच्या काळात डॉ . पोखरणा यांनी असेच बरेच पराक्रम केल्याचे कर्मचारी सांगतात. कोरोना काळात त्यांनी मनमानी कारभार करून कर्मचारी आणि रुग्णांना तसेच नातेवाईकांना मानसिक त्रास दिल्याचे अनेक किस्से सांगितले जातात. सध्या आय सी यु कक्ष जिथे आहे तो भाग अंडर कन्स्ट्रक्शन होता.
आणि नगर मनपाने त्याला कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलेले नव्हते तरी देखील हा आय सी यु कक्ष डॉ . पोखरना यांनी मनमानी पणे सुरु केला. असा आरोप शिवसेना नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केला आहे. कोरोना काळात अव्वाच्या सव्वा दराने सी सी टी व्ही बसवून ३२ लाख रुपयांचा सी सी टी व्ही घोटाळ्याची त्यांची चौकशी सुरु आहे.
इतकी सर्व प्रकरणे असताना आणि वर्षानुवर्षे नगर च्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ठाण मांडून बसलेला सिव्हिल सर्जन डॉ. पोखरना ते घोटाळे करून आणखी किती जणांचे जीव घेणार असा सवाल गिरीश जाधव यांनी विचारला आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून दोषीवर तात्काळ कारवाई करावी आणि सिव्हिल सर्जन वर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भगवान फुलसौंदर यांनी केलीय.