Ahmednagar Hospital Fire :- जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्याची घटना समोर आलीय. आगीच्या घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तण्यात आलीय. तर, काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार हे कोरोना टेस्ट करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आले होते. ते बाहेर उभे असतानाच कक्षाला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोकरणा हेही त्यांच्या दालनामध्ये होते. पोपटराव पवार यांना ही आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी सर्व यंत्रणांना तातडीने फोन केले.
पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, महापालिकेचे आयुक्त यांच्यासह सर्व यंत्रणांना तातडीने फोन केले.
त्यामुळे अग्निशमन दल, जिल्हाधिकारी कार्यालयाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा महापालिकेची यंत्रणा यांनी तातडीने घटनास्थळी धाव धाव घेतली आणि आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न झाला.