अहमदनगर बातम्या

Ahmednagar new : राहुरीत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी प्रतिष्ठापणाला लावूनही विखेंना मताधिक्य वाढले ; विधानसभेच्या रंगीत तालीमीत कर्डीलेंची बाजी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar news : लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघात निलेश लंके यांनी विजय मिळवला, तर डॉ. सुजय विखे पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला; मात्र या निवडणुकीत आमदार प्राजक्त तनपुरे व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचीच प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसून आले. यामध्ये डॉ. विखेंना सुमारे १२ हजार मतांचे मताधिक्य मिळाल्याने आ.तनपुरे पिछाडीवर तर कर्डिले आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच पहिली जात आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणूकीत डॉ. सुजय विखे पाटील यांना राहुरीमधून सुमारे ७१ हजारांचे मताधिक्य मिळाले होते; परंतु त्यावेळेची परिस्थिती पूर्णतः वेगळी होती. राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार आ.संग्राम जगताप हे कर्डिले यांचे जावई असल्याने तनपुरे यांनी विरोधकच उमेदवार असल्याचे समजून भूमिका घेतली होती.

तर विखेंनीदेखील कर्डिले यांच्याऐवजी तनपुरे यांच्याकडूनच अपेक्षा ठेवल्या होत्या, अशा चर्चा झाल्या होत्या. अर्थात त्यावेळी आ. तनपुरे यांना आपली पुढील भूमिका काय असेल, याचा अंदाज नव्हता आणि विखेंनासुद्धा नव्हता. परिणामी विधानसभा निवडणुकीत कर्डिले यांचा पराभव झाला, तर तनपुरे विजयी ठरले. दरम्यान राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. यामध्ये आ. प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्री पदाची संधी मिळाली.तर अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या विखे पाटील यांना फक्त आमदारकीवरच समाधान मानावे लागले.

दरम्यान राज्यात पुन्हा सत्तांतर झाले व महायुतीचे सरकार स्थापन झाले. यामध्ये ज्येष्ठ नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल, दुग्ध व्यवसाय विकास व पशुसंवर्धन खाते मिळाले, तर माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांना जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद मिळाले. डॉ. सुजय विखे पाटील व माजी मंत्री कर्डिले यांनी एकदिलाने राहुरी मतदारसंघ व जिल्ह्यात काम सुरू ठेवले. त्याचा परिणाम म्हणून लोकसभा निवडणुकीतसुमारे १२ हजार व ३२ हजार या प्रमाणे डॉ. सुजय विखे पाटील यांना मताधिक्य मिळाले.

या उलट सुरुवातीला अडीच वर्ष राज्यमंत्री पद नंतर आमदारकी असताना आ. तनपुरे यांना मतदारसंघात खा. लंके यांना मताधिक्य मिळवून देता आले नाही. राहुरीमध्ये लोकसभा निवडणुक विधानसभानिवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिली गेली. पारनेर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड आदी मतदार संघात लंके यांना मताधिक्य मिळाले; परंतु राहुरीमध्ये १२ हजारांचे मताधिक्य विखे यांना मिळाल्याने कर्डिले यांना बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.

Ahmednagarlive24 Office