अहमदनगर बातम्या

राज्यातील १३ साखर कारखान्यांना करोडोंचे कर्ज मंजूर ! यातील तब्बल पाच अहमदनगरमधील, सत्ताधाऱ्यांशी निगडित..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) राज्य सरकारच्या थकहमीवर राज्यातील १३ सहकारी साखर कारखान्यांना सुमारे १ हजार ८९८ कोटी रुपयांचे कर्ज देण्यावर ‘एनसीडीसी’च्या संचालक मंडळाने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे या साखर कारखान्यांच्या आगामी ऊस गाळप हंगामातील बहुतांशी आर्थिक अडचणी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातीलच जवळपास पाच कारखान्यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी साधारणतः १३ ते १४ मार्च रोजी राज्य साखर आयुक्तालयातून राज्य सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविला होता.

आयुक्तालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, २१ साखर कारखान्यांचे मिळून सुमारे २ हजार ८१३ कोटी रुपयांचे प्रस्ताव होते. या प्रस्तावांची छाननी पुन्हा मंत्रालयस्तरावर करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला व राज्यातील १३ साखर कारखान्यांना एक हजार ८९८ कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले.

ज्या साखर कारखान्यांना कर्ज मंजूर झालेय ते सत्ताधाऱ्यांशी लागेबांधे असणारे कारखाने असल्याचे समोर आले आहे. तसेच विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनाही येथे मदत केल्याचे दिसतेय अशी चर्चा आहे.

कोणत्या कारखान्यास किती कर्ज मंजूर ?
अहमदनगर : श्री वृद्धेश्वर सहकारी – 99 कोटी (आ. मोनिका राजळे यांच्याशी निगडित)
अहमदनगर : लोकनेते मारुतीराव घुले ज्ञानेश्वर – 150 कोटी (घुले यांच्याशी निगडित)
अहमदनगर : अगस्ती सहकारी-अकोले – 100 कोटी

अहमदनगर : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी – 125 कोटी रुपये (विवेक कोल्हे यांच्याशी निगडित)
अहमदनगर : सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी – 110 कोटी (अनुराधा नागवडे यांच्याशी निगडित)

पुणे : राजगड सहकारी साखर कारखाना-भोर
बीड : लोकनेते सुंदरराव सोळुंखे सहकारी
बीड : अंबेजोगाई सहकारी साखर कारखाना
सोलापूर : श्री संत दामाजी सहकारी, मंगळवेढा

सातारा : किसन वीर सातारा सहकारी-भुईंज
सातारा : किसन वीर खंडाळा सहकारी-खंडाळा
कोल्हापूर : श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी धाराशिव : श्री विठ्ठलसाई सहकारी

Ahmednagarlive24 Office