Ahmednagar News : राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे ‘लाडकी बहीण’ योजनेनंतर आता ‘लाडका भाऊ अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला आहे.
या योजनेंतर्गत अहमदनगर महापालिकेत विविध पदांवर १४० प्रशिक्षणार्थीची भरती केली जाणार असून या योजनेचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.
महापालिकेत कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने अनेक वेळा कामांचा खोळंबा होतो. त्याचा नागरी सेवांवर परिणाम होतो. आता महापालिकेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेंतर्गत बेरोजगारांना कामाची संधी मिळणार आहे.
त्यातून महापालिकेलाही मनुष्यबळ उपलब्ध होत होणार आहे. मनपा १४० जागा भरणार आहे. त्यांना राज्य शासनाकडून मानधन मिळणार आहे. महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता नावीन्य विभागामार्फत राज्य सरकारने बेरोजगार तरुणांची मानधन योजनेचा निर्णय जाहीर केला आहे.
त्यासाठी दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, आयटीआय झालेल्या बेरोजगार तरुणांनी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या संकेतस्थळावर नावनोंदणी आवश्यक आहे. नंतर महापालिकेकडे अर्ज करता येतील.
महापालिकेत निवड प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारांची निवड होईल. दहावी उत्तीर्ण उमेदवाराला सहा हजार रुपये, आयटीआयसाठी आठ हजार रुपये आणि पदवी, पदव्युत्तर बेरोजगारांना दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
राज्य शासनाकडून हे मानधन थेट प्रशिक्षणार्थीच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे. पात्र उमेदवारांनी शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत.
‘अशा’ असतील जागा
क्लर्क कम टायपिस्ट-३०, स्टेनो-४, अकाउंट क्लर्क-३, ग्रंथपाल सहायक-१, कॉम्प्युटर प्रोग्रामर-३, ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)-५, ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल)-३, ज्युनिअर इंजिनिअर (ऑटोमोबाईल)-३, इलेक्ट्रिक सुपरवायझर-१,
मोटार मेकॅनिक-३, असिस्टंट ग्रैंडर-२, स्पोर्ट ऑफिसर असिस्टंट २, सॅनेटरी सप इन्स्पेक्टर-८, मेडिकल ऑफिसर-१०, लॅब टेक्निशियन्स-३. कम्पाउंडर-२, नर्स (जीएनएम)-१०, नर्स (एएनएम)-१०, फायरमन-१०, वॉटर लॅब टेक्निशयन्स-४, पंप ऑपरेटर-५, प्लंबर ५, इलेक्ट्रिशियन- ५, वायरमन- ५, स्टॅस्टिकल असिस्टंट ३,