माळरानावरील अंडे उबवले, त्यातून झाला दुर्मीळ अशा १७ अजगारांचा जन्म

विविध गोष्टींमुळे अजगरासारख्या सर्पाच्या काही प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कातडीसाठी किंवा विषासाठी सध्या मोठ्या प्रमाणात त्यांना मारले जात असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे त्यांचे संवर्धन देखील गरजेचे आहे. दरम्यान आता अहमदनगरमधील एका सर्पमित्राने केलेली कृती सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरेल अशी आहे.

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : विविध गोष्टींमुळे अजगरासारख्या सर्पाच्या काही प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कातडीसाठी किंवा विषासाठी सध्या मोठ्या प्रमाणात त्यांना मारले जात असल्याचे वास्तव आहे.

त्यामुळे त्यांचे संवर्धन देखील गरजेचे आहे. दरम्यान आता अहमदनगरमधील एका सर्पमित्राने केलेली कृती सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरेल अशी आहे.

गणेश शिंगारे असे या सर्पमित्राचे नाव असून रानात गवसलेल्या अजगराच्या अंड्यांना उबवून त्यातून १७ पिले झाली. ही सगळी दुर्मिळ अजगराच्या (इंडियन रॉक पायथन) जातीची होती.

अधिक माहिती अशी : शिंगारे यांना २० जून रोजी शहरातील एका पडीक जमिनीवर कसली तरी अंडी पडून असल्याचा फोन आला. त्यानुसार शिंगारे व अविनाश परमार यांनी या अंड्यांची पाहणी केली. ती सर्व अंडी अजगराची असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

वनपरिक्षेत्र अधिकारी श्यामकांत देसले यांच्याकडून ही अंडी उबवण्याची परवानगी घेण्यात आली. शिंगारे यांनी एका मोठ्या प्लास्टिकच्या बादलीत पाला-पाचोळा व माती टाकून आणि कृत्रिम आर्द्रता निर्माण करून ती उबविण्यास ठेवली.

तब्बल २० दिवसांनंतर १० जुलै रोजी रात्री त्या अंडीतून १७ पिले सुरक्षित बाहेर आली. ११ रोजी ही माहिती शिंगारे यांनी देसले यांना कळविली. सदर पिलांना संरक्षित जंगलात सोडले जाणार असल्याचे देसले यांनी सांगितले.

विषारी आणि बिनविषारी या दोन्ही प्रकारच्या सर्वांचे निसर्गाचा समतोल राखण्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्पदंशामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने मानव व प्राणी दगावतात. त्यामुळे

आणि त्यांचे प्रचंड औषधी व परिणामी महागड्या विषासह शोभिवंत वस्तूंसाठी उपयुक्त ठरणाऱ्या कातडीमुळे त्यांची बेसुमार हत्या होत आहे, हे थांबायला हवे. असे मत गणेश शिंगारे व्यक्त करतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe