अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : नगरच्या बाजार समितीत २५ हजार क्विंटल कांद्याची आवक, इतका मिळाला सर्वाधिक दर

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : सोमवारी नगरच्या नेप्ती उपबाजार समितीत २४ हजार ९९६ क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सरासरी २०० ते २२०० रुपये असा दर मिळाले. मागील लिलावाच्या तुलनेत यावेळी १०० रुपये भाव वाढले आहेत. मात्र खर्च मोठ्या प्रमाणात झालेला असताना हा दर शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे .

चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. मात्र तरी देखील मोठ्या हिमतीने कांद्याचे पीक घेतले. यासाठी महागडे बियाणे, खते, औषधे आदीचा खर्च केला ऐन कांदा काढणीच्यावेळी कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात राखण्यासाठी केंद्र सरकारने ऑगस्ट २०२३ पासून कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली.

त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून ज्या शेतकऱ्यांकडे कांदा चाळ आहेत त्यांनी कांदा विक्री कारण्याऐवजी साठवणूक केला.मात्र ज्या शेतकऱ्यांकडे कांदा चाळ नव्हती त्यांना कवडीमोल दराने कांदा विकावा लागला. यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या प्रश्नावरून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढीस लागला होता, त्याचा लोकसभा निवडणुकीत दगाफटका बसू नये म्हणून केंद्र सरकारने काही अटी-शर्तींवर कांदा निर्यातबंदी खुली केली. केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी उठवली खरी पण ती उठवताना काही अटी शर्ती घातल्या आहेत.

त्यामुळं कांदा निर्यात करण्यास अडचणी निर्माण होत आहेत परिणामी देशात कांद्याचा पुरवठा जास्त होऊन दरात घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या शेतकऱ्यांना तोटा सहन करुन कंदा विकावा लागत आहे.

आता खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीची वेळ आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील कांदा कवडीमोल भावाने विकत आहेत.पुढील काळात खरीप हंगामातील लाल कांद्याची देखील लागवड केली जाणार असून लाला कांदा साठवला जात नाही त्यामुळे काढणी करून त्याची विक्री केली जाते. परिणामी आता साठवणूक केलेला कांदा कधी विक्री करायचा असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे.

दरम्यान सोमवारी नगरच्या बाजार समितीत ४५ हजार ४४७ गोण्यात भरून आलेल्या २४ हजार ९९८ क्विंटल कांद्याला २०० ते २२०० रुपये असा भाव मिळाला. यातील १ नंबरच्या कांद्याला १७०० ते २२००, २ नंबरच्या कांद्याला १३०० ते १७००, ३ नंबरच्या कांद्याला ७०० ते १३००, तर ४ नंबरच्या कांद्याला २०० ते ७०० असा भाव मिळाला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office