Ahmednagar News : नगर तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरु असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवर नगर तालुका पोलिसांच्या पथकाने अचानक छापेमारी करत एकाच दिवसात आठ ठिकाणचे दारूअड्डे उद्धवस्त केले.
या कारवाईत ४ लाख ७६ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमाल जप्त करत त्याचा नाश करण्यात आला. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सहाय्यक पोलीर निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना नगर तालुका पोलीर स्टेशन हद्दीमध्ये अवैध हातभट्ट दारुसंबधी कारवाई करण्याच् सुचना केल्या होत्या.
त्यानुसा देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, महिला स.फौ. अमिना शेख, हे. कॉ. लगड, सुभाष थोरात मंगेश खरमाळे, म.पो.ना. गायत्र धनवडे, पो. कॉ. कमलेश पाथरुट निलेश खिळे, सोमनाथ वडणे, संभाजी बोराडे, राजू खेडकर असे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन अवैध हातभट्टीवर कारवाईसाठी पाठविले.
या पथकाने प्रथम खंडाळा गावच्या शिवारात जावून दोन हातभट्टयावर कारवाई केली त्यामध्ये हातभट्टी साठी वापरण्यात येणारे एकुण ३३ हजार लिटर कच्चे रसायण नष्ट करण्यात आले व त्यानंतर खडकी गावच्या शिवारात जावून तेथे एकुण दोन गावठी हातभट्टीवर कारवाई करुन एकुण ७० लिटर तयार दारु नष्ट करण्यात आली.
त्यानंतर पथक धोंडेवाडी, वाळकी गावच्या शिवारात जावून तेथे एका हातभट्टीवर कारवाई करुन त्यामध्ये एकुण ८०० लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. त्यानंतर साकत येथे जावून तेथे एका हातभट्टीवर कारवाई करुन त्यामध्ये ४०० लिटर कच्चे रसायन जागीच नष्ट करण्यात आले.
त्यानंतर पथकाने नेप्ती गावच्या शिवारात जावून तेथील दोन हातभट्टीवर कारवाई करुन त्यामध्ये एकुण १३०० लिटर गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणार कच्चे रसायन व ५५ लिटर तयार दारु नष्ट करण्यत आली.
पोलीस पथकाने एकाच दिवशी एकुण आठ हातभट्टीवर कारवाई करुन त्यामध्ये २५ हजार २०० लिटर गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व १२५ लिटर तयार दारु असा एकुण ४ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जागीच पंचासमक्ष नष्ट करण्यात आला.