Ahmednagar News : निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई ! अहमदनगर-पुणे महामार्गावर ५१ लाखांची रोकड पकडली

Ahmednagarlive24 office
Published:
money

Ahmednagar News : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध कारवाया सुरु आहेत. अहमदनगर-पुणे महामार्गावर ५१ लाखांची रोकड जप्त करण्याची मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे.

नगर पुणे जिल्ह्यांच्या सिमेवरील तपासणी नाक्यावर शिरूर पोलीस व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एका कारची तपासणी करीत ५१ लाख १६ हजार रूपयांची रकम जप्त केली. या प्रकरणी आष्टी येथील चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

सागर सुभाष आमले (रा. अंबोरा, ता. आष्टी, जि. बीड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत निवडणूक आयोगाच्या पथकाला संशयित कार (क्र.एमएच २०, बी सी १११) मध्ये निवडणुकीसाठी वापरण्यात येणारी मोठी रकम असल्याची माहिती मिळाली होती.

आमले हा नगर – पुणे महामार्गावरील तपासणी नाका येथे आला असता शिरूर पोलीसांच्या पथकाने कार थांबवून आमले यास ताब्यात घेतले. कारची तपासणी केली असता यामध्ये ५१ लाख १६ हजार रूपयांची रक्कम आढळून आली.

पोलीस तसेच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून याची कसून चौकशी सुरू आहे. मात्र ही रक्कम नेमकी कोणाची, याबाबत खात्रीशिर माहिती मिळू शकेली नाही. दरम्यान आमले याच्या कडून ही रक्कम व्यवसायासाठीची असल्याचे वारंवार बोलले जात असल्याने पुणे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, ही रोकड नगर- बीडकडे जाणार होती असा प्राथमिक अंदाज आहे. सध्या निवडणूक आयोगासह, प्रशासन अगदी कसून तयारीला लागले आहे. निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी सध्या विविध ठिकाणी चेकनाके असून सध्या कसून चौकशी सुरु आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe