अहमदनगर बातम्या

शिक्षक बँकेत मोठी घडामोड ! अध्यक्षांसह ११ संचालकांची हकालपट्टी, बंडखोरांवर कारवाई

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत सत्ताधारी गटात झालेल्या बंडखोरीबाबत स्थापन केलेल्या शिस्तपालन समितीच्या शिफारशीनुसार अखेर अकरा विद्यामान संचालक व पाच श्रेष्ठी अशा एकूण सोळा जणांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांची हकालपट्टी केली.

काल विकास मंडळात झालेल्या आमसभेत हा निर्णय घेण्यात आला. शिक्षक बँकेची सत्ता सभासदांनी बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वातील गुरूमाऊली मंडळाकडे दिली होती.

मात्र दोन वर्षानंतर अध्यक्ष निवडीवेळी नाट्यमय घडामोडी घडून १२ संचालकांनी बंड करत सवता सुभा उभा केला. संबंधितांचा निर्णय घेण्यासाठी रविवारी दुपारी १ वाजता बापूसाहेव तांबे यांच्या उपस्थितीत आणि माजी अध्यक्ष संदीप मोटे यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा पार पडली.

यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त करताना संचालकांच्या बंडावर नाराजी व्यक्त केली. तसेच हा बंड अचानकचा नसून मागील ६ ते ८ महिन्यापुर्वी शिजलेला पूर्वनियोजित कट होता, असेही चर्चेत आले.

दरम्यान, शिक्षक बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड लोकशाही पद्धतीने झाली. त्यांनी कधीही गुरुमाऊली मंडळ सोडले, असे सांगितले नाही. त्यामुळे जिल्हाध्यक्ष, उच्चाधिकार समितीच्या वतीने आम्ही सत्कार केला.

कदाचित आजची हकालपट्टी त्याचे हे फळ असेल. मात्र माझी निवड ही राज्य महामंडळाच्या सभेत झाली, हे विसरू नये. असो, आता सभासदांसमोरच आमची बाजू मांडू, अशी भूमिका गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुरेश निवडुंगे यांनी मांडली.

कोणाकोणावर झाली कारवाई ?
शिक्षक बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब सरोदे, उपाध्यक्ष रमेश गोरे, संचालक अण्णासाहेब आभाळे, कैलास सारोक्ते, भाऊराव राहिज, शशिकांत जेजुरकर, माणिक कदम, योगेश वाघमारे, ज्ञानेश्वर शिरसाठ,

संतोषकुमार राऊत व सुर्यकांत काळे, गुरुमाऊली मंडळाचे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष राजकुमार साळवे, मंडळाचे अध्यक्ष सुरेश निवडुंगे, बँकेचे माजी अध्यक्ष साहेबराव अनाप, शिक्षक संघाच्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष अर्जुन शिरसाठ व बाबा खरात

Ahmednagarlive24 Office