अहमदनगर बातम्या

अपघातग्रस्तांच्या मदतीस गेलेल्या व्यावसायिकावर चाकूने सपासप वार, एमआयडीसीतील घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर शहरामधून मारहाणीच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. आता एका व्यावसायिकावर चौघांनी चाकूने वार केलेत.

धक्कादायक म्हणजे हा व्यावसायिक अपघातग्रस्तांच्या मदतीस धावल्याने हा प्रकार घडला आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या व्यावसायिकास चौघांनी धारदार शस्त्राने मारहाण केली.

रविवारी मध्यरात्री एमआयडीसीत ही घटना घडली. गणेश विलास वाघ (वय ३४ रा. पिंपळगाव उज्जैनी ता. नगर) असे जखमी व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात नितीन (पूर्ण नाव नाही),

संकेत रजपूत (रा. निंबळक ता. नगर), प्रदीप सुनील धिवर व एक अनोळखीविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वाघ रविवारी रात्री त्यांचे हॉटेल बंद करून घरी जाण्यास निघाले असता एटीएन कंपनीच्या गेटसमोर त्यांना गर्दी दिसली.

त्यांनी पाहिले असता अपघात झाल्याचे त्यांना समजले. त्यांनी अपघातग्रस्ताला बाजूला घेतले असता संशयित आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. एकाने त्यांना धरले, दुसऱ्याने शस्त्राने वार करून जखमी केले. इतर दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

मुलींच्या अपहरणाच्या घटना
नगर शहरासह जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटना वाढतच आहेत. शुक्रवारी दुपारी १४ वर्षीय दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्या दोघी मैत्रिणी आहेत.

त्या दोघी दुपारी एकच्या सुमारास शाळेच्या पाठीमागे क्लासला जातो असे सांगून घराबाहेर पडल्या. त्या पुन्हा घरी परतल्याच नाहीत. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा भिंगार शहर परिसरात, नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र त्या मिळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी रात्री उशिरा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.

Ahmednagarlive24 Office