अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : मित्रानेच काढला मित्राचा काटा ; मृतदेह टाकला थेट सांगली जिल्ह्यातील वारणा नदीच्या काठावर…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : मोगर्‍याच्या फुलाचा सुगंध आपल्याला हवा हवासा वाटतो. तो लपवता येत नाही. त्याचा आपण आस्वाद मनमुराद लुटतो. तसच मैत्रीचं आहे. निकोप मनाने स्वतःवर व दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवून ही मैत्री जपली पाहिजे. आपल्या पेक्षा आपण दुसऱ्या व्यक्तीची जेव्हा अधिक काळजी घेतो तीच खरी मैत्री! त्यात जरासुद्धा स्वार्थीपणा नसतो, अपेक्षांचे ओझे नसते, गैरसमजाला थारा नसतो. मात्र अशा अनमोल मैत्रीच्या नात्याला नगरमध्ये मित्रानेच काळिमा फसला आहे.

हॉटेलचे सामान खरेदीच्या बहाण्याने मित्राला कारमध्ये बसवून नगरला आणले आणि शेंडी बायपास रोडच्या कडेला कार थांबवून अज्ञात कारणातून त्याच्या डोक्यात गावठी कट्टूयातून गोळी मारून त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह थेट सांगली जिल्ह्याती वारणा नदीच्या काठावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

भाऊसाहेब रामदास पवार (वय ३२, रा. मोरया चिंचोरे, ता. नेवासा), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, गोरख अशोक माळी व रविंद्र किसन माळी (दोघे रा. रा. मोरया चिंचोरे ता. नेवासा), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यातील रविंद्र माळी याला पोलिसांनी अटक केली असून, गोळी मारणारा गोरख माळी हा पसार आहे. मयत व आरोपी हे एकाच गावातील रहिवासी असून, एकमेकांचे मित्र आहेत. यातील आरोपी गोरख माळी याचे हॉटेल असून, त्या हॉटेलचे सामान खरेदी करण्यासाठी तिघे जण मारुती ईर्टीगा कारने ८ जून रोजी दुपारी नगरला आले होते.

सायंकाळी पाच नंतर एमआयडीसी जवळील दुध डेअरी चौकातून गोरख माळी याने कार शेंडी बायपास रस्त्याने नेली. निर्मनुष्य ठिकाण पाहून रस्त्याच्या कडेला कार उभी केली. त्यानंतर कारच्या शीट खाली लपवून ठेवलेला गावठी कट्टा काढुन अज्ञात करणातून भाऊसाहेब पवार याच्या डोक्यात गोळी घातली.

डोक्यात गोळी लागल्याने भाऊसाहेब हा जागीच खाली कोसळून काही क्षणात मृत झाला. त्यानंतर या आरोपींनी त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी थेट सांगली जिल्ह्यात कुरळप पोलीस स्टेशन हद्दीत वारणा नदीच्या काठी नेवून फेकुन दिला.

दरम्यान कुरळप पोलिसांना अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने त्यांनी त्याचा तपास सुरु केल्यावर सदर मृतदेह हा भाऊसाहेब पवार, याचा असल्याचे समोर आले. त्याच्या नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क साधल्यावर नातेवाईक तेथे गेले असता त्यांनी मृतदेह ओळखला.

त्यामुळे मयताचा मावसभाऊ आण्णा वसंत पवार याच्या फिर्यादीवरून कुरळप पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास सुरु केल्यावर मयत भाऊसाहेब हा गोरख माळी व रविंद्र माळी यांच्या बरोबर नगरला आला होता. तेव्हापासून तो बेपत्ता असल्याची बाब समोर आली.

कुरळप पोलिसांनी नगर पोलिसांच्या मदतीने आरोपींचा शोध घेत त्यातील रविंद्र माळी याला पकडले. त्याच्याकडून या हत्याकांडाचा उलगडला झाला. पोलिस या हत्याकांडातील मुख्य आरोपी गोरख माळी याचा शोध घेत असून, त्याला पकडल्यावरच या हत्याकांडाचे कारण समोर येणार

Ahmednagarlive24 Office