Ahmednagar News : सार्वजनिक रस्त्यावर मुरुम टाकल्याच्या कारणावरुन नऊ जणांनी जीवे ठार मारण्याचे उद्देशाने कोयता, विळा, चाकू, लोखंडी गज तसेच मुरुमामधील दगडाने हल्ला करून मारहाण करत चार जणांना गंभीर जखमी केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड येथे घडली.
या घटनेत धनराज विठ्ठल कुदांडे, नवनाथ विठ्ठल कुदांडे, संतोष रमेश कुदांडे, वामन प्रकाश कुदांडे हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात पुरुषोत्तम हौसराव इंगळे, प्रशांत पुरुषोत्तम इंगळे, संदीप अच्युत इंगळे, दत्ता अच्युत इंगळे,अच्युत हौसराव इंगळे,
घनशाम त्रिंबक इंगळे, सुदाम त्रिंबक इंगळे, त्रिंबक हौसराव इंगळे, रेश्मा घनश्याम इंगळे (सर्व रा. पिसारेखांड) यांच्याविरोधात धनराज विठ्ठल कुदांडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीगोंदा पोलिस करत आहेत.
याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसारः फिर्यादी यांच्या सार्वजनिक रस्त्यापासून घराकडे येणाऱ्या रस्त्यावर पावसाने चिखल झाल्याने या रस्त्यावर फिर्यादी यांचे चुलत भाऊ संतोष रमेश कुदांडे यांनी मुरुम टाकला. मुरूम टाकल्याचा राग येऊन शेजारी राहणारे पुरुषोत्तम हौसराव इंगळे, प्रशांत पुरुषोत्तम इंगळे, संदीप अच्युत इंगळे, दत्ता अच्युत इंगळे, अच्युत हौसराव इंगळे, घनशाम त्रिंबक इंगळे,
सुदाम त्रिंबक इंगळे, त्रिंबक हौसराव इंगळे, रेश्मा घनश्याम इंगळे यांनी संतोष कुदांडे यांच्या घरासमोर येवुन रस्त्याच्या बाजुला मुरुम का टाकला, असे म्हणून मोठमोठ्याने ओरडा ओरड करुन शिवीगाळ करू लागले. आरडा ओरडा सुरू असल्याने फिर्यादी यांनी तेथे जाऊन त्यांना समजावून सांगू लागले असता,
आरोपींनी फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या गळ्यावर कोयत्याने वार केला. गळ्यावर कोयता लागल्याने फिर्यादी ओरडू लागले. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून नवनाथ विठ्ठल कुदांडे, संतोष रमेश कुदांडे, वामन प्रकाश कुदांडे यांनी फिर्यादी यांना
तावडीतून सोडवणूक करत असताना आरोपींनी कोयता, विळा, चाकू, लोखंडी गजाने तसेच मुरुमामधील मोठे दगड उचलुन तुम्हाला एकेकाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देवुन मारहाण सुरू केली. यात चौघेजण गंभीर जखमी झाले.