अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : कोल्हे, विखें सारख्या मातब्बरांच्या हट्टापायी विधानपरिषदेच्या शिक्षक,पदवीधर निवडणुकीत महायुतीमध्ये फूट?

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या मुंबई, कोकण पदवीधर आणि मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर केली आहे.
दरम्यान लोकसभेला एकत्र असलेल्या तिन्ही मित्र पक्षातील अनेक मातब्बर पुढारी विधानपरिषदेच्या शिक्षक,पदवीधर निवडणुकीत उमेदवारीसाठी हट्ट धरून बसले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेच्या शिक्षक,पदवीधर निवडणुकीत महायुतीमध्ये फूट पडेल कि ही निवडणूक महायुती व महाविकास आघाडी मित्रपक्षांसह एकत्र लढेल या बाबत सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या मुंबई, कोकण पदवीधर आणि मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर केली आहे. त्यासाठी येत्या २६ जून रोजी मतदान होईल, तर त्यासाठी ७ जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील.

मनसेने लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिल्याने भाजप आता या उमेदवाराला पाठिंबा देणार का याची उत्सुकता होती. मात्र मुंबई भाजप नेत्यांची नुकतीच बैठक झाली. त्यात सर्व जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय झाल्याची माहिती मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली.

त्यामुळे कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. दुसरीकडे अभिजीत पानसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे मनसेला शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई पदवीधरमध्ये माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या नावाची चर्चा आहे. पण भाजप आणि शिवसेना शिंदे गटात यावर काही तोडगा निघतो का हे पाहावे लागेल.

मुंबई पदवीधरसाठी शिवसेना ठाकरे गटाने अनिल परब यांना उमेदवारी दिलीआहे. भाजप-शिंदे गटात समझोता झाल्यास परब सावंत या दोन शिवसैनिकांत लढत होईल.
तर नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत ते उतरणार असे चित्र दिसून येत आहे.

त्यासाठी ते तयारीला देखील लागले आहे. मागील काही दिवसात विवेक कोल्हेंनी शिक्षक संघटनांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहे. दरम्यान डॉ. राजेंद्र विखे हे देखील भाजपकडून इच्छुक आहेत. त्यामुळे कोल्हे यांना भाजप तिकीट देणार की पुन्हा एकदा विखे हे तिकीटही मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
जर त्यांना भाजपने तिकीट दिल तर विवेक कोल्हे कोणत्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की अपक्ष उमेदवारी करणार? याबाबत मतदारांसह नागरिकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.

 

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office