Ahmednagar News : सावेडी उपनगरातील पाईपलाईन हाडको येथील आंबेडकर चौकात खासगी स्कूल बस चालकाने दोन वर्षाच्या मुलाला चिरडले. ही घटना शनिवारी साडेअकरा वाजता घडली. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विराज सचिन शिरसाट (वय २, रा. पाईपलाईन हाडको आंबेडकर चौक, सावेडी) असे मयत बालकाचे नाव आहे. आईसमोरच दोन वर्षांचा चिमुकला ठार झाल्याची दुर्दैवी घटना नगर शहरात घडली.
ही घटना शनिवारी (दि. १७) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पाइपलाइन हडको परिसरात झाली. या प्रकरणी चालकाविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. किशोर खांडरे (पूर्ण नाव माहीत नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या व्हॅन चालकाचे नाव आहे.
याबाबत प्रमोद बाळासाहेब शिरसाट यांनी फिर्याद दिली आहे. लहान भाऊ विनोद व सचिन शिरसाट हे कुटुंबासह पाईपलाईन हाडको आंबेडकर चौक येथे राहतात.
भाऊ सचिन याची मुलगी प्रोफेसर कॉलनी येथील एका शाळेत शिकत आहे. तिला शाळेत सोडण्यासाठी खासगी ओमिनी बस लावण्यात आली आहे.
शनिवारी सचिन यांची पत्नी मुलीला शाळेत सोडविण्यासाठी आंबेडकर चौकात आली. त्यावेळी छोटा विराज बरोबर होता. मुलगी ओमिनीमध्ये बसली असता विराज ओमिनीपासून काही अंतरावर होता.
चालकाने आजूबाजूला न पाहता ओमिनी सुरू केली. असलेल्या विराजला व्हॅनचा धक्का बसून तो चाकाखाली आला. ही बाब तेथील नागरिकांच्या लक्षात आली.
त्यांनी जोराजोरात आवाज देऊन चालकाला व्हॅन थांबविण्याचा इशारा केला. मात्र, तो थांबला नाही. त्याने व्हॅन पुढे नेली. काही अंतरावर जाऊन चालकाने व्हॅन थांबविली.
त्याने आर्यन व आराध्याला व्हॅनच्या खाली उतरून दिले व निघून गेला. विराजला तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.