अबब ! मिरची १८० रुपये किलो, तूरही भिडली गगनाला

सध्या जसे भाजीपाल्याचे भाव वाढलेले आहेत तसे मिरची, मसाल्याचे पदार्थ, कडधान्य आदींचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. लिलावामध्ये मिरची सर्वाधिक भाव खातानाचे चित्र आहे.

Pragati
Published:
masala

Ahmednagar News : सध्या जसे भाजीपाल्याचे भाव वाढलेले आहेत तसे मिरची, मसाल्याचे पदार्थ, कडधान्य आदींचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. लिलावामध्ये मिरची सर्वाधिक भाव खातानाचे चित्र आहे.

मिरचीला जवळपास १७ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. तूर सध्या १० हजार रुपये क्विंटल भावावर विक्री होत आहे.  दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नगर तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागातून ५५२ क्विंटल भुसार मालाची आवक झाली.

यामध्ये गावरान ज्वारी, सोयाबीन, गूळ डाग, मोहरी, धना, उडीद, हरभरा, मूग, मठ, तूर, मिरची आदी मालाची आवक झाली. यामध्ये गावरान ज्वारीची सर्वाधिक १९४, तर गूळ डागची ११७ क्विंटल आवक झाली.

गावरान ज्वारीला जास्तीत जास्त चार हजार रुपयांचा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सध्या गावरान ज्वारीला मागणी वाढलेली आहे. त्यामुळे भावात वाढ झालेली आहे.

बाजार समितीत बाजारीची २१, तूरची तीन, हरभऱ्याची ५४, उडीदची एक, गव्हाची ३२ क्विंटल आवक झाली. हावरी, काबुली चना, सूर्यफूल, मका आदींची आवक झालेली नाही.

भुसार मालाचे दर
मिरची : ६३०० ते १७९००
तूर : १०००० ते १०००
मठ : ९५०० ते ९५००

मूग : ६५०० ते ७५००
हरभरा : ५८०० ते ६३००
उडीद : ६००० ते ६०००
धना : ५७०० ते ५७००

मोहरी : ५५०० ते ५५००
गूळ डाग : ३३०० ते ५५००
सोयाबीन : ४२०० ते ४३००
गावरान ज्वारी : २३०० ते ४०००

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News