Ahmednagar News : महिलांवरील अत्याचाराच्या घटना अहमदनगर जिल्ह्यातून वारंवार समोर येत आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील सामूहिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता काळी पिवळी जीपमध्ये विवाहितेवर मारहाण करून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
इजाज बागवान असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली.
अत्याचारित महिला ही श्रीरामपूर शहरातील एका परिसरात राहते. वीस दिवसांपूर्वी ती कामावर जाताना इजाज याने तिचा पाठलाग केला होता. त्याबद्दल त्या महिलेने विचारणा केली. त्याची ओळख विचारली.
त्यावर त्याने इजाज बागवान असे नाव सांगितले. त्याने महिलेशी बोलण्याचा आग्रह धरला. त्यास महिलेने नकार दिला असता संध्याकाळी कामावरून घरी येताना पुन्हा त्याने पाठलाग केला होता.
घरी गेल्यावर आरोपी इजाज हा तेथे आला. आपला विवाह झालेला असून दोन मुले आहेत, असे आरोपीला सांगितले. मात्र, त्याने पतीने सोडून दिलेले आहे. त्यामुळे नाटक करू नको असे धमकावले.
हा सर्व प्रकार पाहून मुले रडू लागली. त्यानंतर इजाज तेथून निघून गेला, असे फिर्यादीत पीडित महिलेने म्हटले आहे. १९ जुलै या दिवशी कामावर जात असताना इजाज बागवान हा काळी पिवळी जीप घेऊन आला.
त्याने हात धरून बळजबरीने गाडीत बसविले. तोंडात मारून अत्याचार केला. त्यानंतर कुणाला सांगितले तर दोन्ही मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली.