अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला ‘अच्छे दिन’ ; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना केले ‘हे’ आवाहन

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : एकेकाळी नगर जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळख होती. नगर दक्षिणेत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि उत्तरेत भाऊसाहेब वाघचौरे यांच्या विजयाने प्रस्थापित पक्षांना सुरुंग लागला. आता जोमाने कामाला लागा व आगामी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्हा काँग्रेस बालेकिल्ला हे गतवैभव काँग्रेस पक्षाला परत मिळवून द्या, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नगर जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांना उभारी दिली.

मागील काळात महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष नो व्हेयर झालेला असताना राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अभिनंदन आणि सत्कार काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी केला. या वेळी संपतराव म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ त्यांच्या समवेतउपस्थित होते.

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये नगर जिल्ह्यात दोन्ही जागा महाविकास आघाडीला मिळवण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जे प्रयत्न केले इतर मित्र पक्षांना सोबत घेऊन आपापल्या उमेदवारांना बळ दिले. माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने केलेल्या विशेष प्रयत्नामुळे दोन्ही जागा आपण मिळवू शकलो.

बाळासाहेब थोरात यांनी राज्यातही आपल्या नेतृत्वाचा प्रभाव टाकत जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडीच्या पदरात पाडून घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले, याबद्दल पटोले यांनी आनंद व्यक्त केला. राज्यात काँग्रेस पक्षाचा खुंटा बळकट करण्यासाठी नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनी जे कष्ट घेतले, त्यामुळे राज्यात एकही खासदार नसतानाही २०२४ च्या या निवडणुकीत ती संख्या १३ वर नेली, विदर्भात एका जागेवर समाधान मानलेल्या काँग्रेसने यावेळी पाच जागा आणि महाविकास आघाडीने नऊ जागा मिळवल्या.

हे यश काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीला निश्चितच मोठे बळ आणि आत्मविश्वास देणारे ठरले आहे. यामागे पटोले व बाळासाहेब थोरात यांची रणनीती कामाला आली. आता विधानसभेत तर सत्ता स्थापनेपर्यंतची कामगिरी पटोले आणि थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण करू, असे जयंत वाघ यांनी म्हटले. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आलेले आहेत, महाविकास आघाडीच्या मदतीने जास्तीत जास्त जागा लढवून सर्वच विधानसभेच्या उमेदवारांना आपण निवडून आणू, यासाठी जोमाने कामाला लागा, असा आदेश त्यांनी नगर जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिला.

Ahmednagarlive24 Office