अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : कार्यकर्त्यांच्या नजरा निकालाकडे तर शेतकऱ्यांच्या पावसाकडे

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी अवघा एक दिवस उरला आहे. निवडणूक प्रशासनाची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे, तर प्रमुख पक्षांनीही आपले सक्षम प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात पाठविण्यासाठी नियुक्त केले आहेत.
मतमोजणीत गैरप्रकाराची शंका असल्यास आक्षेप नोंदवून अंतिम निकालपत्रावर सही करायची नाही, अशा सूचनाही काही पक्षांनी आपल्या प्रतिनिधींना दिल्या असल्याचे समजते. मतमोजणी केंद्राच्या परीसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे लोकसभेचा निकाल काहीही लागो याची चिंता शेतकऱ्यांना नाही. यंदा पाऊस चांगल्या प्रकारे होण्याची शक्यता असल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. जिल्ह्यात अनेक भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.
ग्रामीण भागात नागरिक झाडांचा आधार घेत आहेत. सध्या शेतकरी खरिपाच्या तयारीत गुंतला आहे. पावसाची प्रतीक्षा करीत आहे. बी-बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ करताना दिसत आहेत.

यंदा मागील वर्षापेक्षा मान्सून चांगल्या प्रकारे बरसेल असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. मान्सूनची चाहूल लागल्याने शेतकरी आता खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला लागला असून, कृषी विभागानेही खरीप हंगामाची जय्यत तयारी केली आहे.
नियोजनाच्या तयारीसाठी बैठका होत आहे. महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात धडक देण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी लागवड आणि पेरण्यांसाठी शेतजमीनीची मशागत उरकली आहे.
गतवर्षी रब्बी हंगामात कमी पर्जन्यमानामुळे पाणीपातळीत घट आल्याने कमी कालावधीची पिकेघेण्यावर शेतकऱ्यांचा कल राहिला. अवकाळी पावसाने व वादळाने फळबागांच्या नुकसानीची सल मनात धरून शेतकरीवर्ग खरीप तयारीत व्यस्त असल्याचे दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीत कोणीही येवो याचा विचार शेतकरी करताना दिसत नसला, तरी राजकीय कार्यकर्ते मात्र आकडेवारीत गर्क झाले आहेत.

Ahmednagarlive24 Office