Ahmednagar News : महाराष्ट्राला हादरवणारी वकील दाम्पत्याच्या हत्येची घटना राहुरीत घडली होती. राहुरी येथील अॅड. राजाराम आढाव व त्यांची पत्नी अॅड. मनीषा आढाव या वकिल दाम्पत्यांची हत्या २५ जानेवारी २०२४ रोजी हत्या करण्यात आली होती.
आता या हत्येची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरु झाली आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम हे काम पाहणार आहेत. अॅड. आढाव दांपत्य खून खटल्याप्रकरणी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे.
त्यांनी न्यायालयात हजेरी लावली आहे. दरम्यान, यातील आरोपी हर्षल दत्तात्रय ढोकणे व शुभम संदिप महाडिक हे माफीचे साक्षीदार झाले आहेत. राहुरी येथील ॲड. राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ॲड. मनीषा राजाराम आढाव या वकिल दाम्पत्यांचे दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी अपहरण करुन त्यांचा निर्घृण खून करण्यात आला.
या घटनेतील किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग, रा. उंबरे, भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे, रा. येवले आखाडा, शुभम संजीत महाडिक, रा. मानोरी, हर्षल दत्तात्रय ढोकणे, रा. उंबरे, बबन सुनिल मोरे, रा. उंबरे या पाच आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेऊन गजाआड केले होते.
या घटनेतील तीन आरोपींनी तात्काळ राहुरी येथील न्यायालया समोर कबूली जबाब देऊन गुन्हा कबूल केला. यातील किरण दुशींग हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खुणाचे दोन गुन्हे तसेच चोरी, दरोडे, घरफोडी, रस्तालूट, जिवे मारण्याचा प्रयत्न, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.