Ahmednagar News : केंद्र सरकारने काल मंगळवारी आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये केंद्राने भरघोस घोषणा करत काही ठिकाणी दिलासाही दिला आहे.
दरम्यान या अर्थसंकल्पातीलमहत्वपूर्ण घोषणा म्हणजे सोन्याच्या आयात शुल्कात सहा टक्क्यांनी घट करण्याची घोषणा. हे शुल्क सहा टक्क्यांनी घसरल्याने त्याचे परिणाम लगेच बाजारात दिसून आले.

अहमदनगर मध्ये सोन्याच्या दरात तब्बल ३ हजार ९०० रुपये प्रति दहा ग्रॅम घट नोंदवण्यात आली. सोन्याचा दर आता प्रतितोळा (१० ग्रॅम) ६९ हजार २० रुपये झाला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पवर संमीश्र प्रतिक्रिया उमटत असल्या तरी, सोने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. सोने व चांदीवरील आयात शुल्क कमी केल्यामुळे दरात घसरण झाली.
अहमदनगरमध्ये २२ जुलैला सोन्याचा भाव ७२ हजार ९६० रूपये होता. त्यात एकाच दिवसांत कमालीची घसरण होऊन हा दर मंगळवारी ६९ हजार २० रूपयांपर्यंत घसरला.
तसेच चांदीच्या दरातही घसरण पहायला मिळाली. ४ हजार १०० ने कमी होऊन ८५ हजार ६० रूपयांवर पोहोचला आहे.
भावात घसरण झाल्याने खरेदीदारांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे बाजारात खरेदीदारांची संख्या वाढू शकते असा अंदाज आहे.
भाव पुन्हा वाढण्याची शक्यता
आतंरराष्ट्रीय बाजारात रूपयाच्या तुलनेत डॉलरची वाढली तर दर वाढू शकतात. तसेच त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सोन्याच्या मार्केटमध्ये सोन्याचे दर वाढले, तरी आपल्याकडेही दरवाढ होऊ शकते असे मत काही सुवर्णकारांनी व्यक्त केले आहे.