Ahmednagar News : भाज्या, कडधान्यांपाठोपाठ तांदूळ महागला ; पुढील काळात दरवाढीची शक्यता?

Pragati
Published:

Ahmednagar News : सध्या सर्वसामान्यांना दुष्काळाच्या झळायासोबतच महागाईचे चटके देखील बसत आहेत. सध्या तांदळाच्या होलसेल किमतीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळते. तांदळाची आवक कमी झाल्यामुळे आणि हवामानात होत असलेल्या सततच्या बदलामुळे तांदळाच्या किमती वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तांदळाच्या किमतींमध्ये एका किलोमध्ये तीन ते चार रुपये वाढ झाली असून याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.

दरम्यान, बाजारात कोलम तांदळाला अधिक मागणी असून त्याचीदेखील आवक कमी झाली असल्याचे घाऊक व्यापारी पुनीत ठक्कर यांनी सांगितले. नवी मुंबईतील एपीएमसीधान्य बाजारामध्ये तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आधीच महागाईने लोक चिंतातुर असतानाच भाज्या, कडधान्यांच्या किमतीही वाढल्या होत्या. त्यात आता रोजच्या जेवणातील ताटातयेणारा भात अर्थात तांदूळ महागला असल्याने नागरिकांमध्ये काहीशी नाराजी आहे. तांदळाच्या अनेक जाती आहेत.
यात कोलम, बासमती व अन्य ठरावीक तांदळाला नागरिक पसंती देतात. मात्र, बाजारात तांदळाची आवक कमी असल्यामुळे दरात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे व्यापारी सांगतात. पावसाळा तोंडावर आल्याने प्रत्येक जण आपल्या घरात धान्याची साठवणूक करतात. त्यामुळे तांदळाच्या दरात वाढ झाली असली तरी लोक खरेदी करतात.
सध्या वाडा कोलम ३८ ते ७० रुपये किलो दराने विकला जात आहे. वाशीतील एपीएमसी बाजारात दक्षिण भारतातून सर्वाधिक तांदळाची आवक होते. त्यापाठोपाठ राज्यातून नागपूर, ठाणे आदी जिल्ह्यांतून कोलम तांदळाची आवक होते. तर उत्तर भारतातून बासमती तांदूळ येतो. यंदा तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्यता लक्षात घेता तांदळाची साठवणूक होत आहे.

तर बासमती तांदूळ ७० ते ११० रुपये किलो दराने विकला जात आहे. बाजारात अशीच परिस्थिती राहिल्यास येत्या गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात तांदळाचे दर आणखी वाढण्याची शक्यता येथील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe