Ahmednagar News : आज सोमवारी (दि.२७) दुपारी १ वाजता इयत्ता १० वी च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये इयत्ता १० वी ची परीक्षा घेतली होती. यात नगर जिल्ह्याचा निकाल ९५.२७ टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत निकालात १ टक्क्याने वाढ झाली आहे.
मागील वर्षी हाच निकाल ९४.४८ टक्के निकाल लागला होता. या निकालामध्ये यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९७.०१ टक्के तर मुलांचा ९३.८५ टक्के लागला आहे.
जिल्ह्यात पारनेर तालुक्याचा सर्वाधिक ९६.५३ टक्के निकाल लागला आहे. या निकालात पुणे विभागात पुणे जिल्ह्याचा ९७.३० टक्के व सोलापूर जिल्ह्यांचा ९५.९२ टक्के निकाल लागला असून नगर जिल्हा सलग तिसऱ्या वर्षीही तिसर्या क्रमांकावर ९५.२७ टक्के आहे.
नगर जिल्ह्यात ६७ हजार ९७० विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्या पैकी ६४ हजार ७६१ विद्यार्थी पास झाले आहेत. तर ३ हजार २०९ विद्यार्थी नापास झाले आहे. पास होणार्यांमध्ये मुलींचे प्रमाण ९७.०१ टक्के तर मुलांचे प्रमाण ९३.८५ टक्के एवढे आहे.
तालुकावाईज निकाल
पारनेर चा निकाल ९६.५३ टक्के लागला आहे.
जामखेड चा निकाल ९६.५० टक्के लागला आहे.
श्रीगोंदेचा निकाल ९६.४२ टक्के लागला आहे.
अकोलेचा निकाल ९६.३६ टक्के लागला आहे.
कर्जतचा निकाल ९५.९९ टक्के लागला आहे.
शेवगावचा निकाल ९५.८९ टक्के लागला आहे.
कोपरगावचा निकाल ९४.३३ टक्के लागला आहे.
नगरचा निकाल ९५.३३ टक्के लागला आहे.
नेवासेचा निकाल ९५.७३ टक्के लागला आहे.
पाथर्डीचा निकाल ९५.७३ टक्के लागला आहे.
राहताचा निकाल ९४.४३ टक्के लागला आहे.
राहुरीचा निकाल ९४.२३ टक्के लागला आहे.
संगमनेरचा निकाल ९५.६० टक्के लागला आहे.
श्रीरामपूरचा निकाल ९२.५२ टक्के लागला आहे.
जिल्ह्याचा एकूण ९५.२७ टक्के लागला आहे.