Ahmednagar News : अहमदनगरकरांनो पाणी जपून वापरण्याची सवय लावा ! तब्बल ‘इतकी’ पाणी कपात होणार, पाटबंधारे विभागाकडून पत्र

Ahmednagarlive24 office
Published:
water shortage

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यावर सध्या पाणी टंचाईचे सावट पसरले आहे. अनेक धरणातील पाणीसाठा निम्मा झाला आहे तर काही पाणवठे आटले आहेत. जायकवाडीला पाणी सोडल्याने मुळा धरणातील पाण्यावरही याचा परिणाम झाला आहे.

त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे. मुळा धरणातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात २० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला असल्याने नगर शहरावर पाणी संकट उभे राहिले आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना पाटबंधारे विभागाने दिले असल्याची माहिती मिळाली आहे.

यंदा सर्वत्रच कमी पाऊस झाला असल्याने जिल्ह्यातील बहुतांश भागात पाणी टंचाई निर्मण झाली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पाणी साठा आटत चालला आहे.

जायकवाडी धरणात मुळा धरणातून १.९६ टीमसी पाणी सोडण्यात आल्याने धरणातील पाणीसाठा कमी झालाय. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाईशी दोन हात करण्यासाठी प्रशासन विविध नियोजन करत आहे. याचाच एक भाग म्हणून अहमदनगरला केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात २० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती समजली आहे.

पाणी कपातीबाबत आयुक्तांना पत्र
मुळा धरणावरील पाणीपुरवठा योजना की ज्यात अहमदनगर शहराचा देखील समावेश आहे अशा सर्व पाणीपुरवठा योजनेचे २० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतलाय. महापालिकेचा जो मंजूर कोटा आहे त्यातील ही पाणी कपात असून ३१ जुलै २०२४ पर्यत काटकसरीने वापर करण्याबाबतचे पत्र पाटबंधारे विभागाने महापालिका आयुक्तांना दिलेय.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe