अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अहमदनगरकरांचे पुन्हा लाखो रुपये लुटले, शेअरमार्केटमधील ‘डब्बा’ ट्रेडिंगने लाखोंना गंडवले

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शेअर मार्केट खरं तर एक आर्थिक जगतातला एक वेगळाच विषय आहे. यातील ट्रेडिंग असेल किंवा इतर गोष्टी या आर्थिक बांधणीसाठी चांगल्याच. परंतु यामध्ये सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे स्वतःला असणारा अभ्यास.

परंतु सध्या शेअर मार्केटच्या नावाखाली व जास्त आमिष देण्याच्या नावाखाली लोकांना गंडवले जात आहे. अहमदनग जिल्ह्यात असे अनेक प्रकार उघडीस आले असल्याची चर्चा आहे. आता ‘डब्बा’ ट्रेडिंग प्रकरण समोर आले असून यात अहमदनगर मधील अनेक नागरिकांची लाखो रुपयांची लूट झाल्याची चर्चा आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार लोकांना सध्या गुजरातमधून हे कॉल येत आहेत. संबंधितांनी जिल्ह्यातील कोट्यवधी लाटले असल्याचे या क्षेत्रातून चर्चा आहे. प्रत्यक्षात कोणताही ट्रेड न लावता केवळ फोनवरूनच ट्रेड लावल्याचे सांगून हा व्यवहार होतो. याला डब्बा ट्रेडिंग म्हणतात. त्यामुळे अनेक जण डब्यात गेले असल्याचे समजते.

आपकी शेअर मार्केट ट्रेडिंग कैसी चल रही है… आप शेअर मार्केट मे ट्रेडिंग करते हो क्या?’ असे प्रश्न विचारून जाळ्यात ओढले जाते. ‘शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो; परंतु सध्या लॉसमध्ये आहे.’ असे उत्तर येताच ‘आप प्रॉफिटमे होंगे, हमारे साथ ट्रेडिंग करो.’ असे सांगून त्यांच्या जाळ्यात ओढले जाते. सकाळी सव्वानऊ ते साडेनऊच्या दरम्यान ते एखादा कॉल घ्यावयास सांगतात.

त्यामधून नफा मिळवून दिला जातो. तेथूनच विश्वास वाढतो. असे कॉल नफ्यात असतात. नंतर ‘आप ढाई लाख रुपये इन्वेस्ट करो,’ आपको फ्युचर की क्वांटिटी मिलेगी’ असे सांगितले जाते. मागचा एक कॉल बरोबर आल्यामुळे अनेक जण भूलथापांना बळी पडतात. येथूनच फसवणूक होण्यास प्रारंभ होतो. पुढे पाच ते सहा दिवस यांना शेअर मार्केटचा कॉल दिला जातो.

तो अगदी बरोबर येतो. मार्केट खाली जाऊ किंवा वरती; परंतु हे आपल्याला बरोबर असे दर्शवतात, की तुम्हाला यामध्ये १५ ते २० पॉईंट मिळालेले आहेत. या प्रकाराला डब्बा ट्रेडिंग असे म्हटले जाते. दर शनिवारी याचा हिशोब केला जातो आणि मग शनिवारी यांच्या खात्यात त्यांचा प्रॉफिट सुद्धा जमा केले जाते.

यामुळे ट्रेडिंग करणाऱ्याला विश्वास बसतो. त्याचा आनंद द्विगुणीत होतो. आपण ट्रेडिंग करत असताना लॉस होतो; परंतु यांच्या कॉलमुळे आपल्याला फायदा होतो आहे, असे वाटते. मग हा व्यक्ती आपल्या इतर मित्रांना सांगतो. पुढील सोमवारपासून पुन्हा ट्रेडिंगचे कॉल देण्यास सुरुवात होते. सोमवारी कॉल बरोबर आला, की तुम्ही आता आम्हाला दोन हजार, पाच हजार ते दहा हजार क्वांटिटी करून द्या, असे सांगितले जाते.

त्यानंतर अचानक मोठा तोटा झालेला दाखविले जाते. हा तोटा करताना काही ठरावीक कंपन्यांचे शेअर घेतल्याचे दाखविले जाते. असे झाल्यानंतर याच आठवड्यात तोटा होऊन फसगत झाल्याचे स्पष्ट होते. नंतर संबंधितांचे फोन स्वीच ऑफ लागतात.

सावधानता गरजेची
शेअरमार्केट मध्ये जर पैसे गुंतवायचे असतील तर स्वतः त्याचे आर्थिक ज्ञान असे गरजेचे आहे. मार्केटमधील जे विश्वासू ट्रेडर्स किंवा ब्रोकर्स आहेत त्यांची मदत घेणे किंवा त्यांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे असते. त्यामुळे शेअरमार्केट मध्ये अगदी सावधानतेने पैसे गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

Ahmednagarlive24 Office