अहमदनगर बातम्या

अहमदनगरच्या तिघांचा फिलिपिन्समध्ये झेंडा ! ‘आयर्न मॅन’ चा पटकवला किताब

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : १.९ किलोमीटर पोहणे.. ९० किलोमीटर सायकलिंग.. २१.१ किलोमीटर धावणे.. वाचूनच डोळे मोठे झाले ना? पण हेच आवाहन असते आयर्न मॅन होण्यासाठी. आणि एवढं कडक, भयंकर आवाहन पार केलंय अहमदनगरच्या तीन युवकांनी.

‘आयर्न मॅन ७०.३’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करण राजपाल, अमर नाईकवाडी आणि डॉ. अमोल कर्पे यांनी हा पराक्रम केलाय. ‘आयर्न मॅन ७०.३’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे फिलीपिन्समध्ये आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत संगमनेरातील तीन तरुणांनी ‘आयर्नमॅन’ हा बहुमान मिळविला. राजपाल उद्योग समूहाचे संचालक करण राजपाल, आपला बाजार उद्योग समूहाचे संचालक अमर नाईकवाडी आणि पसायदान हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमोल कर्पे यांनी फिलीपिन्समध्ये यशाचा झेंडा रोवला.

आयर्नमॅनसाठी पोहणे, धावणे आणि सायकल चालवणे अशा तिन्ही स्पर्धांमध्ये शारीरिक क्षमतेची कसोटी असते. त्यात १.९ किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१.१ किलोमीटर धावणे, असे कवडे आव्हान प्रत्येक स्पर्धकांच्या समोर असतो.

राजपाल यांनी ३० ते ३४ आणि डॉ.कर्पे आणि नाईकवाडी यांनी ४० ते ४४ वयोगटांत सहभाग घेतला. अतिशय कठीण असलेल्या या स्पर्धेची तयारी करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते, धावणे, सायकलिंग आणि पोहण्यासाठी तयारी करावी लागते.

अनेक दिवसांच्या कठीण परिश्रमानंतर आपल्या शरीरातील बदल आणि स्पर्धेसाठी लागणारे कष्ट यांची सांगड घालून जिम ट्रेनिंगसुद्धा आवश्यक असते. करण राजपाल यांनी म्हटले आहे की, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. तंदुरुस्त राहणे हे निरोगी शरीर आणि मनाचे दोन महत्त्वाचे घटक आहेत.

स्पर्धा अवघड होती, त्यात संगमनेरातील आम्ही तिघांनी सहभाग घेतला आणि यश मिळविले. युवक, तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी केल्याच पाहिजे तसेच जीवनशैली आणि आहार या दोन्ही गोष्टी सांभाळण्याची गरज आहे.

Ahmednagarlive24 Office