Ahmednagar News : अजित पवारच काय पण शरद पवार आले तरी.. ‘तनपुरे’ बाबत माजी आ. शिवाजी कर्डिलेंची ठाम भूमिका, म्हणाले..

Pragati
Published:
kardile

Ahmednagar News : राहुरी येथील डॉ. बाबूरावदादा तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालवायला देण्याचा निर्णय जिल्हा सहकारी बँकेच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी चौथ्यांदा निविदा काढली जाणार असून, त्यासाठीच्या अटी व नियम राज्य सहकारी बँकेच्या धर्तीवर असतील.

जाचक अटी व शर्ती काढून नव्याने निविदा काढण्यात येणार असून त्यात कारखान्याच्या कामगारांच्या देणी रक्कम निविदेमध्ये राहणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी दिली.

अजित पवारच काय पण शरद पवार आले तरी त्यांना कारखाना भाडेतत्वावर देणार
जिल्हा बँकेचे कर्ज जो कोणी फेडण्याची तयारी दाखविल तसेच कारखाना चांगल्या पद्धतीने चालू शेतकऱ्यांसह कामगारांचे हित जोपासेल त्याला कारखाना भाडेतत्वावर देण्याची बँकेची तयार आहे. मग त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा शरद पवार यांनी कोणी कारखाना भाडेतत्वावर घेण्याची तयार दर्शविली तरी त्यांना तो देण्यात येईल, असे शिवाजी कर्डिले यांनी स्पष्ट केले

 कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या संचालक मंडळाची बैठक
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आज बँकेचे अध्यक्ष कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी डॉ. तनपुरे कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी चौथ्यांदा निविदा काढण्याचे ठरले. बँकेने कारखाना ताब्यात घेतल्यानंतर माजी खा. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यात संचालक मंडळ निवडून त्यांना कारखाना भाडेतत्वावर दिला होता. मात्र त्यात काळात बँकेच्या कर्जाची मूळ रक्कम व व्याज हे मिळाले नाही. त्यावेळी कारखान्यावर बँकेचे १०७ कोटी कर्ज होते.

मात्र त्या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या काळात ४८ काटी रुपये बँकेला मिळाले. कारखान्यावर संचालक मंडळ नियुक्ती करून कारखाना भाडेतत्वावर देण्याचा प्रयोग करून पाहिला पण तो अयशस्वी ठरला. त्यामुळे आता कारखाना अन्य संस्थांना भाडे तत्वावर देण्याचा निर्णय झाला.

कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या तिन्ही निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. आता चौथ्यांदा निविदा काढण्यात येणार आहे. आता एक तरी निविदा आली तरी कारखाना भाडेतत्वावर देता येणार आहे. त्यामुळे चौथ्यांदा निविदा काढतांना जाचक अटी व शर्ती काढून तो भाडेतत्वावर देण्याचे ठरल्याचे कर्डिले म्हणाले.

कामगारांची देणी देखील देण्याचा बँकेचा प्रयत्न
कारखान्यावर बँकेचे १३४ कोटी कर्ज झाले आहे. ते कर्ज देण्याबरोबर कारखान्याच्या कामगारांची देणी देखील देण्याचा बँकेचा प्रयत्न राहणार असून या निविदेमध्ये या देणीचा उल्लेख करून ती रक्कम निविदेमध्ये समाविष्ट केली जाणार आहे. त्यासाठी राज्य सहकारी बँकेचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.

गेल्या दोन वर्षापासून बँकेच्या ताब्यात कारखाना आहे. त्यावर दोन कोटी रुपये खर्च झाला आहे. सुरक्षा अन्य कर्मचारी वर्गावर हा खर्च झाला आहे. त्यात आता कारखान्यात चोरीचे प्रमाण वाढले आहे. याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली असून, काही वस्तूंची चोरी झाल्याचे निर्देशनास आले आहे.

मी ‘राष्ट्रवादी’कडून लढतो की काय…
मी अजित पवारांना भेटलो, ‘ते’देखील अनेकदा भेटले आहेत. मात्र माझी भेट बँकेसह इतर काही विषयांवर होती. ती राजकीय नव्हती. परंतु मी राहुरीतून अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’च्या चिन्हावर लढतो की काय, अशी भीती त्यांना वाटत असावी, अशा शब्दात तनपुरेंवर निशाणा साधतानाच जागावाटपात पुढे काय होईल, हे पक्षच ठरवेल, असे सांगून कर्डिले यांनी सस्पेन्स मात्र कायम ठेवला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe