Ahmednagar News : शिर्डी मतदार संघातून भाऊसाहेब वाकचौरे यांनी ४५ हजारांपेक्षा मते घेत महायुतीचे उमदेवार सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला तर
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) निलेश लंके हे देखील आघाडीवर आहेत. नगर आणि शिर्डी मतदार संघातून धक्कादायक निकाल लागण्यास आमदार बाळासाहेब थोरात यांचे खास कारणीभूत ठरले आहेत.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) निलेश लंके यांनी मोठे मताधिक्य घेऊन आता विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. तर दुसरीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे ( ठाकरे गट) भाऊसाहेब वाकचौरे यांनी महायुतीचे उमदेवार सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला आहे. दरम्यान मतदारसंघातील या धक्कादायक निकाल पाठीमागे आमदार बाळासाहेब थोरात यांचा मोठा वाटा आहे.
बाळासाहेब थोरात यांनी आजवर राज्यसरकार मधील महत्वाची पदे भूषविली आहेत. त्यामुळे त्यांना प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. तसेच थोरात हे राज्यातील मोठे वलयांकित नेते आहेत. त्यामुळे त्यांचा जिल्ह्यात मोठा जनसंपर्क आहे. लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यापासून थोरात यांनी काँग्रेसमधील असलेली दुफळी बाबत लक्ष देत ती शांत केली. सर्वाना सोबत घेत दिलेली जबाबदारी यशवीपणे पार पाडली. तसेच जिल्ह्यातील विखे यांच्या विरोधकांची सांगड घातली. स्वपक्षातील नव्या जुन्यांचा मेळ घालून हा धक्कादायक निकाल लावला. त्यामुळे शिर्डी आणि अहमदनगर मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात किमयागार ठरले आहेत.