Ahmednagar News : कोरोना सारखी आणखी एक महामारी येणार ! ब्रिटिशच्या वैज्ञानिकांनी दिला इशारा

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना महामारीमुळे झालेले नुकसान कधीच भरून येणार नाही. कोरोनामुळे जगाच्या अर्थवस्थेवर देखील परिणाम झाले होते. त्यामुळे या महामारीचे केवळ नाव जरी घेतले तरी देखील त्या काळातील झालेल्या वेदनांची आठवण येते.

परंतु याच संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोरोना सारखी महामारी पुन्हा येण्याचा इशारा ब्रिटन सरकारचे माजी वैज्ञानिक सल्लागार पॅट्रिक वालेंस यांनी दिला आहे. काही काळानंतर आणखी एक महामारी येणे निश्चित आहे. त्यामुळे अशा महामारीचा सामना करण्यासाठी अगोदरच सज्ज राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कोरोना सारख्या स्थितीचा सामना करण्यासाठी आपल्याला अगोदरच तयार राहावे लागेल; परंतु आतापर्यंत आपण महामारीचा सामना करण्यासाठी तयार झालो नाहीत, अशी खंत पॅट्रिक वालेंस यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखवली. सुरुवातीलाच धोकाओळखण्यासाठी चांगली निगरानी प्रणाली स्थापन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

महामारीच्या स्थितीत वेगाने चाचणी, निदान आणि लसीकरण करण्यासारख्या गोष्टींवर काम करण्याचा सल्ला त्यांनी सरकारला दिला. २०२१ साली जी-७ देशांच्या बैठकीत महामारीविरोधात एकत्रित होण्याची गरज आपण व्यक्त केली होती. यासाठी काही उपाय देखील सुचवलेहोते; परंतु २०२३ पर्यंत जी-७ देशांनी आपला सल्ला विसरल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

महामारीचा सामना करणे, हे युद्धाप्रमाणे असले पाहिजे. आपल्याकडे भक्कम सैन्यदल आहे. लागलीच युद्ध होईल, यासाठी हे सैन्यदल नाही, तर एक राष्ट्र म्हणून ही आवश्यक गोष्ट आहे. त्याचप्रमाणे महामारीकडे देखील पाहिले पाहिजे. महामारीचा सामना करण्यासाठी सैन्यदलाप्रमाणे अगोदरच सज्ज राहण्याची गरज वालेंस यांनी व्यक्त केली. दरम्यान कोरोना सारख्या स्थितीचा सामना करण्यासाठी यापूर्वी आरोग्य यंत्रणा सक्षम नव्हती किंवा त्यांच्याकडे तशी सामग्री,मनुष्यबळ कमी होते तरी देखील कोरोनाकाळात आपण उत्तम काम केले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe