अहमदनगर बातम्या

अहमदनगरमध्ये ‘येथे’ दोन पक्षांच्या नेत्यांत ‘राडा’? मोठा तणाव,पोलिस बंदोबस्त…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील सक्कर चौक परिसरात दोन राजकीय गटांत तुफान राडा झाला असल्याची माहिती समजली आहे. खुन्नसने पाहणे व जुन्या राजकीय वादातून हा राडा झाला असे तेथील प्रत्यक्षदर्शी नागरिक सांगत होते.

येथे दोन्ही गटात बाचाबाची व झटापट झाली. ही घटना दुपारी घडली. दोन्ही गटापैकी कोणीही फिर्याद दिली नाही. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.

स्टेशन रस्त्यावरील सक्कर चौकात शुक्रवारी दुपारच्या सुमारास सक्कर चौक येथे दोन प्रादेशिक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये खुन्नसने पाहणे व जुन्या राजकीय वादातून राडा झाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तिथे बाचाबाची व झटापट झाली.

दुचाकी रस्त्यात अडव्या लावल्याने परिसरात मोठी गर्दी झाली होती. दोन्ही गटातील काही ज्येष्ठ व्यक्ती तिथे आल्यानंत वादावर पडदा पडला. मात्र, या घटनेचा व्हीडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने परिसरात गर्दी जमली होती.

या घटनेची माहिती मिळताच कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, उपनिरीक्षक महेश शिंदे पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून सायंकाळी उशिरापर्यंत चौकात बंदोबस्त ठेवला होता.

दरम्यान, दोन्ही बाजूने कोणीच फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात आले नाही. पोलिसांनी सार्वजनिक जागी वाहने अडवी लावून आपसात झुंज करणे, सार्वजनिक शांततेत बाधा आणल्याच्या आरोपावरून दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक शितल मुगडे करीत आहेत. पोलिसांकडून चौकात लावलेल्या सीसीटीव्ही, व्हायरल होणारे व्हीडिओची पडताळणी करून आरोपींची नावे निष्पन्न करण्याचे काम सुरू आहे.

सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करून सामाजिक शांततेस कोणी बाधा आणण्याचा प्रयत्न करीत असले तर त्यांची नावे पोलिसांना कळविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

Ahmednagarlive24 Office