अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : जनावरे पकडून दिल्याने मुलांवर हल्ला, हिंदुत्त्ववादी संघटना आक्रमक

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पोलिसांना जनावरे पकडून दिल्याचा राग मनात धरुन तिघा अज्ञात हल्लेखोरांनी सुकेवाडी परिसरातील घोडेकर मळ्यात तीन लहान मुलांना फायटरने जबर मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील रहिवासी असणारा मोहित वर्पे त्याच्या मित्रांसह सुकेवाडी येथून दुचाकीवरून संगमनेर येथील एका चष्म्याच्या दुकानात चालले होते. ते घोडेकर मळ्याजवळ आले असता अचानक पाठीमागून गाडीवरून आलेल्या अनोळखी तिघांनी वर्पे यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करून पढे गेले, त्यांनी पन्हा मागे वळून येत मोहित वर्पे याच्या मोटरसायकलला धडक दिली.

त्यातील तिघांपैकी एकाने खिशातून फायटर काढून मोहितच्या डोक्यावर, डाव्या बाजूस कानावर मारले. या मारहाणीत मोहितचे डोके फुटले. त्याच्या मित्राला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
जनावरांची माहिती दिली म्हणून मारहाण करण्यात आल्याचे शहरात समजताच बजरंग दलाचे कार्यकर्ते शहर पोलीस ठाण्यात आले.

लहान मुलांना मारहाण करणाऱ्यांवर तत्काळ गंभीर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे सचिन कानकाटे, गोलू ठाकूर, प्रशांत बेल्हेकर, भाजपचे संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल खताळ, छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख खंडू सातपुते यांनी केली.

पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि पुढे अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मोहित वर्षे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी अज्ञात तिघांवर गन्हे दाखल केले.

८३ गायींची केली कत्तलीतून मुक्तता
बकरी ईदच्या पूर्वसंध्येला आणि बकरी ईदच्या दिवशी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कार्यकर्त्यांनी कुरण गावात राबविलेल्या धाडसत्रात कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या ८३ गायींची सुटका केली. रविवारी मध्यरात्री कुरणमध्ये कत्तली करण्याच्या उद्देशाने आलेल्या १७ जिवंत गाईची तर कुरण येथेच सकाळी ४७ गायीची मुक्तता केली. अशा एकूण एकूण ८३ गाईंची केली

Ahmednagarlive24 Office