अहमदनगर बातम्या

Ahmednagar politics : ‘बा’ विठ्ठला आता तुझाच आधार ! … एक्झिट पोलनंतर घालमेल? विखेंचे पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडे

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar politics : लोकसभेच्या निकाल लागण्यास अवघे काही तास शिल्लक असताना एक्झिट पोलमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके हे आघाडीवर दाखवले आहेत. तर महायुतीमधील भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे पिछाडीवर दाखवले गेले.

एक्झिट पोलच्या या अंदाजानंतर नगर भाजपमध्ये सन्नाटा पसरला आहे. मात्र याबाबत कोणीही पुढे येऊन प्रतिक्रिया द्यायला तयार नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पुढे येत पुत्र सुजय विखे यांच्या विजयाचे दावे करत आहेत. यामुळे विखे यंत्रणा नगरमध्ये एकटी पडल्याचे सध्याचे चित्र आहे. सहाजिक विखे परिवार सुजय विखे यांच्यासाठी विजयाबाबत अस्वस्थ आहे.

एकादशीच्या निमित्त्ताने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे हे परिवारासह सकाळीच पंढरपुरात दाखल झाले. विखे परिवार विठ्ठल-रुक्मिणी चरणी लीन झाला. सुजय विखे यांच्या विजयासाठी यावेळी त्यांनी साकडे घातले.

लोकसभेच्या निकालाबाबत दोन दिवसापासून विविध एक्झिट पोलकडून अंदाज वर्तवण्यात येत आहेत. मात्र यात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके हे आघाडीवर दाखवले आहेत. तर महायुतीमधील भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे पिछाडीवर दाखवले गेले.

एक्झिट पोलच्या या अंदाजानंतर विखे परिवाराची देखील चांगलीच घालमेल वाढली आहे. खासदार डाॅ. सुजय विखे यांच्या विजयासाठी विखे परिवार सोमवारी सकाळीच पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी चरणी लीन झाले. “नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जनता महायुतीसोबत आहे.

त्यामुळे सुजय विखे मोठ्या मताधिक्यांनी विजयी होतील. नगर जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही जागा निवडून येतील. राज्यात महायुतीला ४० पेक्षा जास्त जागा मिळतील. देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला आहे”. असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केला. तसेच राज्यातील दुष्काळाची धग कमी होऊन पाऊस-पाणी भरपूर पडू दे, असे साकडे विठुरायाला घातले असल्याचे ते म्हणाले.

Ahmednagarlive24 Office